Header Ads Widget


लग्नाचे आमिष दाखवून फसवणुक करणारी टोळी पकडण्यात कुरुंदवाड पोलीसांना यश.

LiveNationNews Bulletin

कोल्हापूर, दि. २५/०१/२०२३.
कुरुंदवाड ता. शिरोळ येथे नमूद गुन्हयातील फिर्यादी यांना लग्नासाठी मुलगी दाखवून तीचे सोबत लग्न करुन देतो असा विश्वास देवुन लग्ना करीता दोघांचे कडून एकुण रोख रक्कम ३,४०,०००/- रुपये (तीन लाख चाळीस हजार रुपये रोख) व फिर्यादी यांनी नवरी मुलीस लग्नाचे वेळी केलेले तीन तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे पैंजण असे मिळून ४,६०,०००/- रुपये सोबत घेवून गेलेने यातील ०८ आरोपित यानी फिर्यादी यास खोटी व अप्रामाणिक कथने करुन अप्रामाणिकपणाने वरील रक्कमेची फसवणूक केलेने फिर्यादीने दिले तक्रारीवरुन कुरुंदवाड पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तपासाचे दरम्यान वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली कुरुदंवाड पोलीस ठाणेकडील पोहेकॉ चव्हाण, सागर खाडे व महिला पोलीस अंमलदार पूजा आठवले यांनी तांत्रीक माहिती घेवून गोपनीय रित्या बातमी काढून आरोपी यांना सुलतानगादे ता. खानापूर जि. सांगली, मदनवाडी ता.इंदापूर जि. पुणे, गंगानगर, हडपसर पुणे, भोसरी पुणे, माळवाडी, भिलवडी ता. पलूस जि. सांगली व पंचवटी नाशिक येथून ताबेत घेवून सदर गुन्हयाचे कामी अटक करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कारवाई शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक कोल्हापुर, निकेश खाटमोडे-पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, रामेश्वर वैजने, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपुर विभाग जयसिंगपुर, यांचे मार्गदर्शनाखाली बालाजी भांगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड, ए.ए.पाटील पोलीस उपनिरीक्षक, व्ही.आर.घाटगे सहा.पोलीस उपनिरीक्षक,ए.बी.चव्हाण पोहेकॉ ५३४,सागर खाडे पोकॉ २२९३,पूजा आठवले महिला पोकॉ २४९५ कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनी केली.
केल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने नागरीकांना अवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे पैसे घेवून लग्न करणारे टोळी पासून सावध राहून जर असा कोणी प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कोल्हापूर पोलीस दलाशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

|