Header Ads Widget


बीट मार्शल यांच्या सतर्कतेमुळे विदेशी चलनाचे अमिश दाखवून फसवणूक करणारी परराज्यातील टोळी जेरबंद.

LiveNationNews Bulletin

मुंबई शहर, दि. २५/०१/२०२३.

नेहरुनगर पोलीस ठाणेस सन 2022 मध्ये परकीय चलन कमी किंमतीत देण्याचे अमिश दाखवून फिर्यादी यांचेकडून एक ते दोन लाख रुपयापर्यंत रोखीने घेवुन परकीय चलन न देता फसवणुक केलेबाबत वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले होते. सदर गुन्हयाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 06, श्री. हेमराजसिंह राजपूत, सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती गोपिका जहांगीरदार व वरिश्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर भाबल यांनी अशा प्रकारे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना व मार्गदर्शन केले होते. पोलीस ठाणे हद्दीतील गस्तीवरील मोबाईल वाहने, बीट मार्शल वरील अधिकारी अंमलदार यांना सतर्कपणे गस्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक 14/01/2022 रोजी पो.शि.क्र. 113529/बोडके हे रात्रपाळी गस्त करित असताना त्यांना नेहरु नगर कॉलनी, येथे एक इसम संशयित असल्याचे दिसुन आले. त्यावेळी त्यांनी सदर इसमास हटकले असता तो पळुन जावु लागला, पो.शि.बोडके यांनी त्यास पाठलाग करुन पकडले व पुढील चौकशीकामी पोलीस ठाणेस आणण्यात आले व त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात मिळून आलेल्या तपकिरी रंगाच्या कापडी पिशवीत राखाडी रंगाच्या रूमालाच्या बंडलवर अमेरीकन डॉलर चिकटविलेला दिसुन आला.
सदर इसमाचा पोलीस ठाणे, येथे कलम 420, 34 भा.द.वि. या गुन्हयात सहभाग निश्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचेकडे केेलेल्या तपासावरून त्याचे नमुद गुन्हयातील इतर दोन साथीदार यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीतांकडुन एकुण 64 सिम कार्ड व चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपीतांकडे अधिक तपास केला असता, त्यांनी परकीय चलन कमी किंमतीत देण्याचे अमिश दाखवून यापूर्वी नेहरूनगर पोलीस ठाणे हद्दीत 04 व नागपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत 01 गुन्हा असे एकुण 05 गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. सध्या नमुद आरोपी हे नेहरूनगर पोलीस ठाणेच्या पोलीस कोठडीत आहेत.
सदरचा तपास वरिश्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. ठिकेकर, सपोनि. भोसले, पोउनि. सुर्यगंध, पोउनि राक्षे, पोहक्र. 960159/आव्हाड, पोनाक्र.03228/कसबे, पोशिक्र 111964/उगले, पोशिक्र. 110426/बारगजे, पो.शिक्र 092503/वानखेडे, पोशिक्र. 110843/बेंडकोळी, पोशिक्र 113589/भागवत यांनी केला आहे.
परकीय चलन कमी किंमतीत देण्याचे अमिश दाखविणारे फोन आल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाणेस संपर्क साधावा तसेच कोणत्याही भुलथापांना नागरीकांनी बळी पडू नये, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

|