Header Ads Widget


तोतया ईडी अधिकारी यांना 24 तासामध्ये बेडया ठोकल्या


LiveNationNews Bulletin

मुंबई शहर, दि. २५/०१/२०२३.

फिर्यादी हे झव्हेरी बाजार मुंबई येथे सोने दागिने विक्रीचा व्यवसाय करतात. दि. 23/01/2023 रोजी साधारण दुपारी 02.00 वाजणेच्या सुमारास फिर्यादी व त्याचे कामगार कार्यालयात काम करीत असताना दुपारच्या सुमारास जेवण्याच्या वेळी फिर्यादी याचे दुकानात दोन अनोळखी इसम हे दुकानात जबरदस्तीने आत आले. त्याचवेळी आत प्रवेश केलेल्या दोन इसमांपैकी एका इसमाने कामगार माली यांचे कानशिलात मारले, त्यामुळे फिर्यादींनी त्या ‘‘दोन इसमांना तुम्ही कोण आहात?” असे विचारले असता’ त्यापैकी एका इसमाने तो ‘‘ईडी कार्यालयाकडुन आले असल्याचे सांगुन त्यांनी विराटभाई कोठे आहे?” असे विचारले व फिर्यादी व त्यांचेबरोबर काम करणारे सर्व कामगार यांचे मोबाईल त्यांनी ताब्यात घेतले. त्यापैकी एका इसमाने फिर्यादी याचे कार्यालयावर ईडीने धाड टाकली असल्याचे सांगितले. तसेच कार्यालयातील रोख रक्कम, सोने व इतर किमती वस्तू एकत्रीत करावयास सांगितले. त्यावेळेस फिर्यादी यांनी त्यांचेकडे किरकोळ सोने आहे असे सांगितले असता त्यांनी फिर्यादी यांचेकडे असलेल्या कपाटाची चावी जबरीने काढुन घेतली. त्यानंतर त्या दोघा इसमांपैकी एकाने समोरील कपाट त्यांनी दिलेल्या चावीने उघडुन कपाटातील पैसे असलेल्या तीन्ही बॅग त्यांनी घेतल्या. नमुद तिन्ही बॅगेमध्ये एकुण 25,00,000/- रुपये होते.
त्यानंतर त्या दोन्ही इसमांनी फिर्यादी यांचे दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे जबरदस्ताने खिसे तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे सर्व कामगार हे त्यांना विरोध करत होते. त्यावेळी एका कामगाराच्या खिश्यामध्ये असलेले 2.5 किलो (22 कॅरेट) वजनाचे सोने व कार्यालयात कांउटरमध्ये असलेले 500 ग्रॅम सोन्याची लगड त्यांनी जबरीने काढुन घेवुन कामगार यांचे देखील जोरात कानशिलात मारली. सदरवेळी फिर्यादी त्यांना ‘‘पुन्हा तुम्ही कोण आहेत व इतर कागदपत्रे दाखवा असे त्यांना सांगितले असता’’ तुमको जानसे मार डालुंगा अशी धमकी देवुन त्यांना हाथकडी दाखवुन कामगाराचे हातात घातली. व त्यानंतर त्यांनी फिर्यादींच्या दुकानातील घेतलेले रोख रुपये, व सोने तसेच मोबाईल्स फोन घेवुन तसेच फिर्यादी व कामगार यांना देखील ताब्यात घेवुन ते बिल्डींगच्या खाली आले.
त्यानंतर सदर टिमने फिर्यादी, कामगार यांना घेवुन त्यांचे जुने ऑफीस असलेल्या शॉप नं. 17 अे, डायमंड हाउस, धनजी स्ट्रिट, मुंबई येथे गेले. सदर ऑफीसमध्ये यापुर्वीच त्याची दुसरी टिम मधील हे एक महीला व पुरुश यांनी कार्यालयातील मॅनेजर यास ताब्यात घेवून बसलेले होते. सदर महीलेने देखील फिर्यादींना मोठया आवाजात ‘‘विराटभाई किधर है असे विचारले’’ त्यावेळी त्यांनी तीला देखील विराटभाई हा गावी गेल्याचे सांगितले. सदरवेळी तीने फिर्यादींना पुन्हा त्यांचे नाव व पत्ता विचारुन तीने लिहुन घेतला. त्यानंतर कामगार यांचे हातातील हाथकडी त्या महीलेने काढण्यास सांगितली. त्यामुळे त्या दोन इसमांपैकी एका इसमाने त्यांचे हातातील व कामगारांचे हातातील हाथकडी काढली. व तेथुन त्यांना जाण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादी व कामगार ऑफीसमध्ये घाबरुन परत आले.
त्यानंतर फिर्यादी यांनी त्याचे काका यांना बोलावून घेवून त्या परिसरांत ईडी अधिकाऱ्यांचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाहीत म्हणून फिर्यादी यांनी आजुबाजुच्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा सदरची बाब ही पोलीसांना समजताच पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व नमुद घटनेच्या अनुशंगाने फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करुन लो.टी.मार्ग पोलीस ठाणे, येथे कलम 394, 506(2),120(ब), भा.द.वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तपासः नमुद गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपीताना गुन्हा घडल्यानंतर 24 तासाचे आत ताब्यात घेण्यात आले आहे. सदरवेळी नमुद आरोपीतांकडे केलेल्या तपासामध्ये त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने मा. सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतत पालन करुन अटक करण्यात आले आहे.
नमुद गुन्हयामधील अटक आरोपीतांकडुन जबरीने चोरी केलेले रोख रुपये 15,00,000/- व 2.5 किलो सोने अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.
तरी नमुद आरोपीताकडे केलेल्या तपासामध्ये अटक आरोपीतांचे अजुन काही साथीदार असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे. नमुद आरोपीताबाबत अधिक माहीती प्राप्त करुन नमुद पाहीजे आरोपीतास पोलीस अटक करीत आहेत. तसेच गुन्हयातील उर्वरीत मालमत्ता हस्तगत करीत आहोत.
अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), मुंबई, श्री. दिलीप सांवत, श्री. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, मुंबई, श्री. जोत्स्ना रासम, सहायक पोलीस आयुक्त, पायधुनी विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिश्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. ज्योती देसाई यांच्या अधिपत्याखालील स.पो.नि.राहुल भंडारे, स.पो.नि. सुशिलकुमार वंजारी, स.पो.नि.बनकर, स.पो.नि.डिगे, स.पो.नि.दराडे पो.उ.नि.रुपेश पाटील, पो.उ.नि.मोकल, पो.उ.नि. प्रदिप भिताडे, पोउनि शिवाजी पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकांचे पो.ह.कांबळे, पाटील,परुळेकर,पो.ना.सानप,पो.ना.संदिप पाटील,पो.ना.मुन्नासिंग पो.शि.षेंडे, वाकसे, बगळे, होटगीकर, गुजर,खांडेकर,सांळूखे, साटम, शिंदे, जोशी,कदम,राठोड यांनी अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments

|