LiveNewsNation Bulletin
ठाणे, दि. २५/०१/२०२३.
दि. 23/01/2023 रोजी आरोपी लोक सेवक वय 50 वर्षे सुरक्षा अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांना तक्रारदार यांचेकडून 1,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. थोडक्यात हकिकत खालीलप्रमाणे.
यातील तक्रारदार हे खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. नमुद एजन्सीस कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यात कंत्राट मिळालेला आहे नमुद कंत्राटानुसार तक्रारदार हे एजन्सी तर्फे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अखत्यारितील एका महत्वाच्या ठिकाणी वायरलेस पॉईंट येथे तक्रारदार व आणखी एक सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. यातील लोकसेवक यांनी तक्रारदार व त्यांचे सहाकारी यांना एजन्सी तर्फे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अखत्यारितील ठिकाणावर कायम ठेवण्याकरिता दरमहा 500/- प्रमाणे तक्रारदार व त्यांचे सहकारी त्यांचे एकत्रित मिळून 1000/- रू. लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.
नमुद तक्रारीच्या अनुशंगाने दि. 20/01/2023 रोजी केलेल्या पडताळणी मध्ये यातील लोकसेवक यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे मागील महिन्याचे 1000/- रू. लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अेसीबी ठाणे पथकाने सापळयाचे आयोजन करून लोकसेवक यांना तक्रारदार यांचेकडून नमुद लाचेची रक्कम रू. 1000/- स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.
सदर लाचेची सापळा कारवाई पोलीस अधीक्षक श्री सुनिल लोखंडे लाप्रवि ठाणे परिक्षेत्र ठाणे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल घेरडीकर लाप्रवि ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. योगेश देशमुख, पोलीस निरीक्षक, अेसीबी ठाणे अेसीबी ठाणे, मपोहवा/देसाई, पोहवा/सोनावणे व पोहवा/कडव, अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांनी यशस्वीरित्या सापळा कारवाई केलेली आहे.
0 Comments