Header Ads Widget


दिड वर्षांपासुन वापराविना अतिरिक्त दोन बाईक अॅम्ब्युलन्स नंदूरबार जिल्हा परिषदेच्या परिसरात धुळ खात..अधिकार्‍यांच्या चौकशीवर हवा-हवाई उत्तर

प्रतिनिधी ' सईद कुरेशी
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जिथे बाईक अॅम्ब्युलंन्स सारख्या रुग्णवाहिकेचा सुविधांचा अत्यावश्यक गरज आहे, अशातच मागील गेल्या दिड वर्षांपासुन वापराविना अतिरिक्त दोन नव्या कोऱ्या बाईक अॅम्ब्युलन्स या नंदूरबार जिल्हा परिषदेच्या औषध भांडार विभाग परिसरात धुळ खात  पडलेल्या अवस्थेत असल्याने त्यावर श्वान व पशुपक्षी आपला निवास करीत असल्याचे चित्र दिसुन आले आहे. 
प्लॅऩ इंडीया या संस्थेने या दोन बाईक अॅम्ब्युलन्स आरोग्य विभागाला दान दिल्या आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या आवारत या दोन्ही अॅम्ब्युलंन्स गेल्या दिड वर्षांपासुन वापराविना धुळ खात पडुन आहेत, 
त्यामुळे या बाईक अॅम्ब्युलन्सच्या काही तात्रीक कारणास्तव परिवहन विभागाकडे नोंदणीच न झाल्याने त्या अजुनही हस्तांतरीत झाल्या नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे, तर प्लॅन इंडीयाच्या समन्वयकांनी याबाबत दिल्ली स्तरावरुन कार्यवाही सुरु असुन लवकरच या वापरात येतील असेही सांगितले असले, तरीदेखील प्रत्यक्षात दोन्हीही विभागांनी मात्र चुप्पी साधून प्रसार माध्यमांशी बोलण्यास चक्क नकार दिला आहे.


Post a Comment

0 Comments

|