Header Ads Widget


जामिया संस्थेच्या युनानी मेडिकल कॉलेज आणि असल्लाम रुग्णालय यांच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.



अक्कलकुवा ! Akkalkuwa/LivenationNews 
प्रतिनिधी /अल्ताफ मलकानी 



     अक्कलकुवा येथील जामिया संस्थेच्या युनानी मेडिकल कॉलेज आणि असल्लाम रुग्णालय यांच्या वतीने  (ता.०८) जानेवारी रोजी  भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामिया संस्थेचे अध्यक्ष मौ.गुलाम मोहम्मद वास्तनवी होते.तर शिबिरासाठी सुरत येथील प्रसिद्ध लोखात रुग्णालयातील तज्ञ डॉ.वसीम मंन्सुरी,डॉ.तेजल दलाल,डॉ.साद कानुगा,डॉ.स्नेहा पटेल,डॉ.विहंगकुमार पटेल,डॉ.बिरजू पटेल,डॉ.रझ्झाक बोहरा तसेच असल्लाम रुग्णालय अक्कलकुवा येथील डॉ. आरिफ शेख,डॉ.मलहान पटेल,डॉ.फारुख शेख उपस्थित होते.

      वातावरणात दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहे, बदलत्या ऋतुमानाने लोकांचे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागातील लोकांना रोगनिदानासाठी शहरात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही.यामुळे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे जामिया संस्थेचे अध्यक्ष मौ. गुलाम वास्तनवी यांच्या संकल्पनेने जामिया अक्कलकुवा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात  जनरल चेकअप,कान-नाक-घास,हाडांचे आजार,स्त्रीरोग,त्वचारोग,बालरोगआदी सर्व रोगांवर तपासणी व औषधोपचार करण्यात आले.दरम्यान तब्बल ३८५ रुग्णाची तपासणी व औषधोपचार करण्यात आले.तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांना शिबिरामार्फत जाणाऱ्या रुग्णांना सुरत येथील लोखात रुग्णालयात शस्त्रक्रिया खर्चात ५० टक्के सूट दिली जाणार आहे.
       प्रसंगी मौ.हुजैफा रंदेरा,मौ. उवेस रंदेरा,अखलाख शेख व लोखात रुग्णालयातील कर्मचारी,युनानी मेडिकल कॉलेज आणि असल्लाम रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|