कोंडवाईबारी घाटात रात्री झोपेत आयसर धडकला
चालक कँबीन मध्ये ..अडकून जागीच ठार
सहचालक जबर जखमी
सकाळी चार वाजे ची घटना
जेसीबी च्या सहाय्याने चालकास बाहेर काढले
नवापूर! Navapur/LivenationNews
प्रतिनिधी /समीर पठाण
नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सहा वरिल कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचौदर गावाच्या शिवारात रात्री चार वाजेच्या दरम्यान ओरंगाबाद हुन अद्रक भरून गुजरात राज्यातील सुरत येथे जाणारा आयसर टेम्पो क्रमांक एम.एच.20 ई.एल.9067 वरिल चालक कोंडाईबारी घाट येथुन भरघाव वेगात येत असतात ,खांबचौदर गावाच्या शिवारात झोपे च्या गुंगीत समोर जात असलेल्या अज्ञात वाहना ला जोरदार धडक दिली या धडकेत आयसर टेम्पो ची पुर्ण कँबीन चक्काचूर होवून चालक शेख रियाकत शेख हबीब रा.खुलताबाद जि.ओरंगाबाद हा जागीच ठार झाला तर सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीसांना माही मिळताच घटनास्थळी पो.उप.नि.अमृत पाटील, हे.कॉ.संजय माळी ,साहेबराव खांडेकर, योगेश सोनवणे, चालक राजु कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने मयत चालक आणी जखमी सहचालका ला बाहेर काढले ,सहचालक जबर जखमी असल्याने त्यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .
0 Comments