साक्री !Sakri/LivenationNews
प्रतिनिधी /अकिल शहा
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने २०१५ पासून प्रगतीकडे वाटचाल सुरु केली असून बॅंकींग क्षेत्रातील विविध योजनांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी बॅंक बांधील असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे चेअरमन तथा मा.आ.राजवर्धन कदमबांडे यांनी साक्री येथील राजे लॉंस मध्ये आयोजीत भव्य सत्कार समारंभाला व बॅंकेच्या ठेवी लक्षांकप्राप्तीसाठीच्या मेळाव्यात बोलतांना प्रतिपादन केले.
साक्री येथील राजे लॉंस मध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा ठेवी लक्षांक प्राप्ती साठीचा मेळावा व जिल्हा नेते बॅंकेचे चेअरमन मा.आ.राजवर्धन कदमबांडे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा बॅंकेचे जेष्ठ संचाल दर्यावगीर महंत, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती व बॅंकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, पांझरा कान साखर कारखान्याचे मा.संचालक माहरु मारनर, साक्री नगरपंचायतच्या नगराध्यक्षा जयश्रीताई पवार, गटनेते तथा उपाध्यक्ष बापूसाहेब गीते, बांधकाम सभापती, अँड. गजेंद्र भोसले, महिला व बालकल्याण सभापती जयश्रीताई पगारीया, बाजार समितीचे मा.सभापती दिलीप काकुस्ते, जि.प.सदस्य विजय ठाकरे, दिपक भारुडे, मा.सदस्य मधुकर बागुल, उद्योजक लक्ष्मिकांत शहा, ललित अरुजा, पं.स.चे गटनेते उत्पल नांद्रे, नगरसेवीका अँड.पुनम काकुस्ते, दिपक वाघ, महिरचे सरपंच रमेश सरक, भाजपचे मा.ता.अध्यक्ष विजय भोसले, आबा सोनवणे, महेंद्र देसले, विनोद पगारीया, महेश अहिरराव, मुन्ना देवरे, सचिन शिंदे, मुकुंद घरटे, रावसाहेब घरटे, प्रविण देवरे, दिलिप विसपूते, हर्षल बिरारीस, मनिष गीते, बंडू गीते, धनराज चौधरी, चेतन जाधव, अतूल दहीते, शरातील व्यापारी बांधव, तालुक्यातील वि.का.सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन, सदस्य, पतसंस्थांचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक हर्षवर्धन दहिते मार्गदर्शन करतांना म्हणाल्रे की, काही वर्षापुर्वी बॅंकेची स्थिती बिकट होती, विरोधक अपप्रचार करीत होते मात्र बॅंकेची धुरा चेअरमन.राजवर्धन कदमबांडे यांनी हाती घेतल्यानंतर बॅंकेची उत्तरोत्तर प्रगती होत असून बॅंक सर्व क्षेत्रात सक्षम झाली आहे. कर्ज माफीचा सर्वाधीक लाभ आपल्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या बॅंकेच्या धोरणामुळे झाला. शेतकरी बांधवांना कर्ज वाटपाचे जे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले होते.त्या उद्दिष्टांपेक्षा जास्तीचे कर्ज वाटप बॅंकेने केले. आता जिल्हा बॅंक ही फक्त शेतकरी बांधवांचीच नाही तर व्यापारी व समाजातील सर्व घटकांसाठी सेवा देण्यासाठी तत्पर झाली आहे. या बॅंकेच्या माध्यमातून मिळणार्याी सोयी सुविधा व सेवा ह्या राष्ट्रीयकृत बॅंकेच्या तोडीच्या असून ठेवीवरीअल विमा संरक्षण असल्याचेही त्यांनी सांगीतले.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना राजवर्धन कदमबांडे म्हाणाले की, साक्री तालुका खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रेम करणारा तालुका असून माझ्या राजकीय कारकिर्दीत साक्री तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकरी बांधवांसाठी ० % व्याजदराने ३ लाखापर्यंतचे कर्ज पुरवठा केला जात आहे. नाबार्डच्या सहकार्याने विविध सेवा सुरु केल्या आहेत. ए.टी.एम.ची सुविधा सुरु केली. समाजातील दुर्लक्षीत घटकाला बचत गटांच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम बॅंकेच्या माध्यमातून केले आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर १००% विमा संरक्षण दिले असल्याने ठेवीदारांनी आपल्या हक्काच्या जिल्हा बॅंकेत ठेवी ठेवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी दिलीप काकुस्ते, बॅंकेचे व्यवस्थापक जी.एन.पाटील व काही शेतकरी बांधवांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बॅंकेच्या साक्री शाखेतील अधिकारी व कर्मचारी बांधवांनी केले होते.
0 Comments