Header Ads Widget


भटक्या- विमुक्त जमातीतील मतदारांसाठी , जनजागृती एक अनोखा उपक्रम घेण्यात आले...


कळंब ! Kalamb/LivenationNews 
प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजेद चाऊस व प्रमुख पाहुणे डॉ. घोलप के. जी.  होते. शिराढोण येथे वास्तव्यास असलेले राजपूत ठाकूर या भटक्या विमुक्त जमातीच्या कबिल्यात जाऊन मतदार जनजागृती केली व 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदान नोंदणी करण्याचे आवाहन केले .भारतात निःपक्षपाती पद्धतीने निवडणूक घेण्यासाठीच भारत निवडणूक आयोग या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली आणि भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक देश झाला. या घटनाक्रमांचे स्मरण करण्यासाठी तसेच मतदानासाठी जास्तीत जास्त नागरिकांना प्रेरणा देण्याकरिता राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतात. असे प्रमुख पाहुण्यांनी म्हटले.

‘मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्की मतदान करणार’ही यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना मतदारांना समर्पित आहे. मतदानामुळे मिळालेल्या सामर्थ्याच्या माध्यमातून, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याविषयी प्रत्येकाची भावना आणि आकांक्षा प्रतीत होते. असे प्राचार्य डॉ. साजेद चाऊस यांनी म्हटले. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्रा. डॉ. सय्यद अमर यांनी केले कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|