Header Ads Widget


74 वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.....

कळंब! Kalamb/LivenationNews
प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी

शिरढोण येथील अटल बिहारी आंतरराष्ट्रीय शाळा येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक ,तसेच सरपंच,उपसरपंच, सदस्य,शालेय पालक वर्ग यांची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.यामध्ये, विविध प्रकारच्या गाण्यांचा सहभाग होता.कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेतील विविध खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही व सन्मान चिन्ह देऊन यथोचित असा सन्मान  करण्यात आला.राज्यस्तरावर निवड झालेल्या दोन विद्यार्थ्यांचे कौतुक शालेय समितीच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद, शालेय समिती सदस्य,पालक वर्ग यांनी मोलाचे परिश्रम घेतले. शेवटी मुख्याध्यापक श्री.जाधव सर व शालेय समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

Today is Saturday, April 12. | 9:40:47 PM