Header Ads Widget


शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकाकडून अंमली पदार्थ (गांजा) विरोधी कारवाई, एका आरोपींकडून दोन किलो गांजा जप्त.

 

LiveNationNews Bulletin

कोल्हापूर, दि. 29/01/2023
पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस.कायदा कलम ८(क),२०(ब), ii(ब) प्रमाणे,फिर्यादीचे नाव व पत्ता प्रविण आप्पासो कांबळे पो.कॉ.७३९ शिवाजीनगर पो.ठाणे.
दि. २४/०१/२०२३ रोजी रात्री २०:०० वाजतेचे सुमारे घटनेतील आरोपीत हा स्वतः चे फायद्याकरीता बेकायदेशीरपणे पंचगंगा फ़ॅक्टरी रोड कबनूर येथे गांजा विक्रीसाठी येणार आहे. अशी गोपनीय बातमी प्राप्त झालेने पो.नि.महादेव वाघमोडे यांनी तात्काळ वरिष्ठांना कल्पना दिली. त्यानंतर वरील पोलीस अधिकारी व गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांचेसह फ़ॅक्टरी रोड कबनूर या ठिकाणी सापळा कारवाईचे आयोजन करुन नमुद इसमास ताबेत घेतले. तेव्हा आरोपीचे कब्जात विक्री करणेकरीता आणलेला एका खाकी रंगाचे प्लास्टिक चिकट टेप मध्ये गुंडाळलेली वस्तु त्यामध्ये पांढर्या रंगाचे पारदर्शक प्लास्टिक पिशवीत संमिश्र अशी सुकलेली पाने, फूले व बिया असलेला साधारण हिरवट व तपकिरी रंगाचा ओलसर पदार्थ असा गांजा, प्लास्टीकच्या पिशविसह एकूण २ किलो १०१ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बाजार भावाने किंमत २०,०००/- रुपये तसेच त्याचेकडील दोन मोबाईल फोन १८,०००/- रुपये व टि.व्ही.एस.कंपनीची ज्युपीटर मोपेड १,१०,०००/- रुपये किमतीची असा एकुण १,४८,०००/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह मिळुन आलेने तो मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. यातील फिर्यादी यांनी दिले फिर्याद दिले वरुन गुन्हा दाखल करणेत आला आहे.
अटक मुदतीत यातील आरोपींचे मोबाईल नंबरवरुन तांत्रिक माहिती घेतली असता त्याने यापूर्वी देखील गांजा विक्री केले असलेचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त केलेला गांजाहा त्याने मिरज येथून आणलेचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचे तपासात आणखीन गांजा विक्री करणारे आरोपी निष्पन्न होवून गांज्याचे रॉकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यातील आरोपी वय ४०, रा. माळभाग पाण्याचे टाकीजवळ, उमळवाड, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर याचेवर यापूर्वी जबरीचोरी, दरोडा, एनडीपीएस व शासकीय कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उप निरीक्षक मिथुन सावंत, पो.ना.उदय पाटील, सागर चौगले, प्रविण कांबळे, विजय माळवदे, अरविंद माने, सुनिल बाईत, सुकुमार बरगाले,सतिश कुंभार, पवन गुरव, असिफ मुल्लाणी सर्व नेमणूक शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी केली.

Post a Comment

0 Comments

|