Header Ads Widget


नांदेड मध्ये जबरी चोरीचे गुन्हे दाखल.

 

LiveNationNews Bulletin

नांदेड, दि. 29/01/2023
भाग्यनगर :- दिनांक 24.01.2023 रोजी चे 21.25 वा. चे सुमारास, शिवसाईनगर तरोडा बु. येथे रा. पाथरकर यांचे घरासमोर रोडवर नांदेड येथे, यातील फिर्यादी ही कुंकवाचा कार्यक्रम संपवुन घराकडे जात असतांना दोन अज्ञात आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीचे पाठीमागुन येवुन फिर्यादीच्या गळयातील अडीच तोळे सोन्याचे मिनी गंठण किंमती 1,20,000/-रूपयाचे जबरीने हिसका मारून चोरून घेवुन पळुन गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भाग्यनगर येथे कलम 392, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि/श्री कांबळे, हे करीत आहेत.

मुदखेड :-दिनांक 25.01.2023 रोजी चे 13.00 वा. चे सुमारास, भोकर मुतखडे रोडवर बॅका गावाच्या जवळ कॅलनचे उतारा जवळ मुदखेड जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर ता. मुदखेड जि. नांदेड येथे, यातील अज्ञात आरोपीतांनी संगणमत करून यातील फिर्यादी हा त्याचे शाखेचे महिला बचत गटाचे हफ्त्याचे पैशाची वसुली करण्यासाठी त्यांची होंडा शाईन कंपणीने वरदडा तांडा मुदखेड भोकर महिला बचत गटाचे पैसे वसुली करून व वाई येथे मीटिंग करून बचत गटाचे पैसे वसुल करून मुदखेडकडे निघाला असतांना भोकर ते मुदखेड रोडवरील मेंढका गावाचे जवळील उतारा जवळ मुदखेड जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर आल्यावर फिर्यादीचे पाठीमागुन दोन मोटार सायकल वर तीन अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीचे मोटार सायकल समोर येऊन थांबवुन चाकुचा धाक दाखवुन बॅग मधील व खिशातील नगदी 1,30,236/- रूपये व सॅमसंग टॅब जुना वापरता किंमती 7,000/- रूपयाचा बायोमॅट्रीक डिव्हाईस जुना वापरता किंमती 1000/- रूपयाचे कंपणीची सीजिटी अमाउंट 335/- रूपये व दोन मोबाईल किंमती दहा हजार रूपयाचे असा एकुण 1,48,571/-रूपयाचा मुद्येमाल जबरीने काढुन घेवुन पळुन गेले. वगैरे फिर्यादी वय २८ वर्षे दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुदखेड येथे कलम 392, 504, 34 भादवी सह कलम 4/25 भाहका कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि/श्री वटाणे, हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|