Header Ads Widget


लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

 

LiveNationNews Bulletin

नाशिक, दि. २६/०१/२०२३.
तक्रारदार यांच्या चुलत्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे तहसिल कार्यालय निफाड, यांचेकडील खातेवाटप आदेशाची 7/12 उता-यावर नोंद घेवुन मंजुर करून देण्यासाठी आलोसे कोतवाल, सजा भरवस, ता.निफाड, जि.नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे 5000/- रूपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.
सदर तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आलोसे कोतवाल,सजा भरवस, ता.निफाड, जि.नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे 5000/- रूपये लाचेची मागणी केली व त्यापैकी 3000/- रूपये लाचेची रक्कम आज दि. 25.1.2023 रोजी तलाठी कार्यालय, देवगाव, ता.निफाड, जि.नाशिक येथे स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांचेविरुध्द भ्र्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

|