Header Ads Widget


बुलेट व इतर मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरटयास गुन्हे शाखा, घटक -3 कल्याण यांनी केले जेरबंद

LiveNationNews Bulletin

कल्याण डोंबिवली, दि. २६/०१/२०२३.

कल्याण-डोंबिवली परिसरातुन मोठया प्रमाणात मोटार सायकली चोरीस जात असल्याने मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ गुन्हे शाखा, घटक-3, कल्याण यांनी विशेष पथक स्थापन केले होते.
गुन्हे शाखा, घटक-3, कल्याण कडील पोलीस अंमलदार/4358 गुरूनाथ जरग यांनी प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून व त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस उपनिरीक्षक/कळमकर व त्यांचे पोलीस पथकाने कोळेगाव, मानपाडा, डोंबिवली पुर्व परिसरातुन संशयीत इसम वय-19 वर्षे रा.सध्या मंदाबाई चाळ, राजनोली गांव, भिवंडी (मुळ रा.मु.येल्नुर, ता.निलंगा जि.लातुर) यास ताब्यात घेऊन त्याचेकडे मोटारसायकल चोरी केली असुन, ती सध्या निलंगा जि.लातुर या ठिकाणी ठेवली असल्याची माहिती दिली. त्यानंतर माहात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हे अभिलेख पडताळणी करता सदरबाबत भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आरोपीत यास दि. 20.01.2023 रोजी नमुद गुन्हयात अटक करून मा.न्यायालया कडुन सदर आरोपीत याची 04 दिवस पोलीस कस्टडी रिंमाड मंजुर करून घेवुन सदर आरोपीत याचेकडे अधिक चौकशी करता त्याने कल्याण डोंबिवली परिसरातुन एकुण 13 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर वरील गुन्हयाचे तपासात सदर आरोपीकडुन कल्याण डोंबिवली परिसरातुन चोरी केलेल्या एकुण 16,05,000/- रूपये किंमतीच्या 13 मोटारसायकली निलंगा, लातुर, सोलापुर व पुणे जिल्हयातुन हस्तगत करून गुन्हे शाखा, घटक 3, कल्याण यांनी कल्याण व भिवंडी परिमंडळ मधील तसेच कल्याण रेल्वे पोलीस ठाणे कडील एकुण 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीअशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री.शिवराज पाटील, सहा.पोलीस आयुक्त, शोध -1, श्री. राजकुमार डोंगरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक/किशोर शिरसाठ, पोउपनि/श्री.मोहन कळमकर, पोउपनि/श्री.नवनाथ कवडे, पोहवा/1021 विश्वास माने, पोहवा/3518 अनुप कामत, पोहवा/1271 किशोर पाटील, पोहवा/2453 रमाकांत पाटील, पोहवा/6250 बालाजी शिंदे, पोहवा/4692 विलास कडु, पोहवा/6201 प्रकाश इदे, पोहवा/2033 प्रविण बागुल, पोहवा/4416 प्रविणकुमार जाधव, पोहवा/3129 गोरखनाथ पोटे, पोहवा/3491उल्हास खंडारे, मपोहवा/2800 ज्योत्सना कुंभारे, मपोहवा/774 मेघा जाने, पोना/1118 सचिन वानखेडे, पोना/5193 देवेप्पा हुंडेकरी, पोशि/7685 विनोद चन्ने, पोशि/5548 गोरक्ष शेकडे, चापोहवा/6243 अमोल बोरकर, पोशि/4664 राहुल ईशी या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

|