Header Ads Widget


बनावट रबरी शिक्के तयार करुन त्यादवारे बनावट व्हिसा, बनावट कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र,बनावट बॅक अकाउंट स्टेटमेंट बनविणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…

LiveNationNews Bulletin

मुंबई शहर, दि. २६/०१/२०२३.

गुन्हे शाखा, कक्ष ५, येथील स.पो.नि. अमोल माळी यांना अंधेरी (प), मुंबई याठिकाणी बनावट पासपोर्ट, व्हिझा बनविण्यात येत असल्या बाबत मिळुन आलेल्या बातमीवरून गुन्हे शाखा कक्ष ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मोठया कुशलतेने छापा टाकुन बनावट कागदपत्रे बनविणा-या आरोपीतांना जेरबंद केले.
या छाप्यात आरोपीतांच्या कब्जातुन एकूण २८ विविध व्यक्तीचे पासपोर्ट, १६ व्यक्तीच्या पासपोर्टच्या प्रथम पानाची कलर प्रिंट आउट, विविध व्यक्तींचे व विविध देशांचे एकुण २४ व्हिझा, बनावट व्हिझा बनविण्याकरीता उपयोगात येणारे UAE, MAURITIUS, THAILAND, MALAYSIA, SOUTH AFRICA, SINGAPORE, ROISSY, MALDIVES, CANADA, ISTANBUL, FRANCE, ATHINA, REPUBLIC DE GUATEMALA या व इतर देशांच्या ईमीर्गेशन डिपार्टमेंटचे बनावट रबरी शिक्के, विविध क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयातील Dy- Passport Officer यांचे बनावट रबरी शिक्के, व्हिजा बनविण्याकरीता उपयोगात येणारी पितळी डाय, बनावट अकाउंट स्टेटमेंट बनविण्याकरीता State Bank of India, Punjab National Bank, HDFC Bank, Bank of Baroda, Axis Bank, Central Bank of India, Indus Bank, Indian Bank, IDFC Bank, ICICI Bank, IDBI Bank, Yes Bank, KNB Bank या व इतर बँकांचे वेगवेगळ्या शाखांचे एकूण ४० रबरी शिक्के, बनावट कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्राकरीता जे. जे. रुग्णालय येथील वैदयकीय अधिकारीच्या नावे असलेले बनावट रबरी शिक्के, एअरपोर्ट वैदयकीय अधिकारी यांच्या नावे असलेले बनावट रबरी शिक्के असे एकूण ४१४ रबरी बनावट शिक्के, स्टॅम्पींग मशीन, लेमीनेशन मशीन, युव्ही टयुब लाईट मशीन, चिप बेस्ड कोरे स्मार्ट कार्ड, स्टॅम्प बनविण्याकरीता से रंगाच्या रबरी शिट, क्लॅम्प व प्लायवुड, ट्रान्सपरंट शिट, लॅमीनेशन पेपर, प्लास्टीक रबर स्टॅम्प होल्डर, मिनी हेटर, लोखंडी शिक्का, प्रिंटर शाई, पासपोर्ट ड्रंक, लॅगीनेशन प्लॅस्टीक, प्रिंट पेपर, पासपोर्ट प्रिंट करण्याकरीता फोरे जाड पेपर, शासकीय अधिकारी यांचे शिक्के मारलेली कोरी लसीकरण प्रमाणपत्रे, पासपोर्ट शिवण्याकरीता सुई धागा, कैंची, ब्लेड, पोवीस्टीक, कटर, स्टिल पट्टी, राजमुद्रेचे चिन्ह व भारत सरकार, आयकर विभाग लिहीलेले सिल्व्हर रंगाचे रिफ्लेक्टर स्टिकर्स व आरोपीतांचे वापरते मोबाईल हॅन्डसेट, ०२ संगणक, ०३ कलर प्रिंटर, ०१ स्कॅनर, ०७ पेन ड्राईव्ह व इतर संगणकीय साहीत्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान एकूण ०२ आरोपीतांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. नमूद आरोपीताने यापूर्वी अनेक व्यक्तींना बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात पाठविले आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपी क्र. १ पुरुष इसम, वय ६२ वर्षे व आरोपी क्र. २ पुरुष इसम वय ३८ वर्षे यांना आज रोजी मा. न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता मा. न्यायालयाने नमूद आरोपीतांना दिनांक ०४/०२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, श्री. विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई, श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पो. उप आयुक्त (प्रकटीकरण), श्री. प्रशांत कदम, सहा. पो. आयुक्त (मध्य) श्री. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे प्र.पो.नि. घनश्याम नायर, पो.नि. सदानंद येरेकर, पो. नि. अजित गोंधळी, स.पो.नि.अमोल माळी, पो.उ.नि. बैंडाले, स. पो.उ.नि. सांळुखे, स.पो.उ.नि. भुजबळ, पो.ह.क्र. २९७९९/ राणे, पो.ह.क्र. ३१२४२/ देसाई, पो. ३१२३४/पैंगणकर, ३३८२७ / निरर्भवणे, पो.ह. क्र. ९६०५३६ / विचारे, पो.ह.क्र. ९९००३३/ वायंगणकर, पो.ह. क्र. ०१५८ / चिलप, पो.ना.क्र. ०३७३८/ जाधव, पो.शि.क्र. ०८०६८६ / मुलाणी, पो.शि.क्र. ०८०३६२ / काळे, म.पो.ह.क्र. ९८०५४४ / शिंदे, म.पो.ना. ०६०९६८/ साळवी, म.पो.ना. ०९१३२९ / भावना पाटील, म.पो.शि.क्र. ०९११३९/ शुभांगी पाटील, म.पो.शि.क्र. ०९१४०१ / सुप्रिया पाटील आणि स.पो.उ.नि.चा. घोरपडे, पो.ह. चा. ९९०६०७ / कांबळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|