LiveNationNews Bulletin
पालघर, दि. २६/०१/२०२३
दिनांक 20/01/2023 रोजी रात्रौ 24:00 वाजेचे सुमारास वाडा पोलीस ठाणे हद्दीतील कोंढले बांधनपाडा, ता. वाडा येथे रहाणारा इसम वय 35 वर्षे, हा त्याच्या घराच्या बेडरुममध्ये झोपलेला असताना झोपेतच त्याचा मृत्यू झालेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाडा पोलीस ठाणे येथे फौ.प्र.सं. कलम 174 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर मयताचे प्रेताचे शवविच्छेदन केले असता मयताचे डोक्यात कोणत्यातरी टणक हत्याराने मारुन डोक्यात अंतर्गत दुखापती करुन व त्याचा गळा दाबुन खून केलेबाबत वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, वाडा यांनी अभिप्राय दिला. यावरून वाडा पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.सं कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, अतिरीक्त चार्ज जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांना वाडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या. प्राथमिक तपासात नमूद मयत इसमाचा अनैतिक संबंधातुन खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहीतीच्या आधारे व तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसतांना सखोल व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी क्र. 1) वय 36 वर्षे, रा.कंचाडपैकी पांढरेपाडा, ता. वाडा, आरोपी क्र. 2) वय 30 वर्षे, रा. कंचाडपैकी फणसपाडा, ता. वाडा आरोपी क्र. 3) वय 27 वर्षे, रा. काटी, पो. खुपरी ता. वाडा, आरोपी क्र. 4) वय 22 वर्षे, रा.वाघोटे, ता. वाडा, महिला आरोपी क्र. 5) वय 36 वर्षे, रा.कोंढले बांधनपाडा, ता. वाडा यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करुन 12 तासाचे आत गुन्हयाची उकल करण्यात आली आहे. नमूद आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास हा दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, अतिरीक्त चार्ज जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे, सपोनि/विलास जाधव, नेमणुक वाडा पोलीस ठाणे, पोउनि/गणपत सुळे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, वाडा पोलीस ठाणेचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
0 Comments