Header Ads Widget


पदवीधर मतदारांना आपले नाव शोधणे होणार सुलभ

LiveNationNews Bulletin

नाशिक,दि 27 जानेवारी,2023 (विमाका वृत्तसेवा) नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना कोणत्या मतदान केंद्रात आपले नाव आहे, याची माहिती शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने एक लिंक तयार केली असून, ही लिंक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

या लिंकमुळे पदवीधर मतदारांना आपले नाव शोधणे खूप सोपे होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणूक-२०२३ चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक दिली आहे. सदर लिंक विभागातील पाचही जिल्ह्याच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर (Homepage) प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त  रमेश काळे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

|