नंदुरबार जिल्हा प्रतिनिधि :LiveNationNews Bulletin
दि. 24/01/2023 रोजी सकाळी 09/30 ते सांयकाळी 05/00 वा. दरम्यान श्रीमती अनिता देविदास मराठे यांचे शहादा शहरातील विजय नगर येथील घराच्या दरवाजाचे कुलुप अज्ञात आरोपीतांनी तोडुन 3000/- रु रोख व 1,32,300/- रु कि. सोन्याचे दागिने असा एकुण 1,35,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गु.र.नं. 33/2023 भा.दं.वि. कलम 454,380 प्रमाणे दिनांक 25/01/2023 रोजी 15/19 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा शहरातील विजय नगर सारख्या परिसरात दिवसा झालेल्या घरफोडीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सदर घटनेबाबत शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे यांनी सदर घटनेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे 03 वेगवेगळे पथके तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
दिनांक 25/01/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील विजय नगरमध्ये झालेली चोरी शहादा शहरातील श्रमीक नगर परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी केली असल्याची बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे यांना सांगितली. शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे यांनी शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना सदरची माहिती सांगून संशयीत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून विचारपुस करणेबाबत आदेशीत केले.
शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी तात्काळ मिळालेल्या माहितीमधील दोन अल्पवयीन मुलांची माहिती काढली असता, तेे घरी असल्याचे समजले. पथकाने अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांसमोर ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारून विजय नगर येथील चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची चोरी केली असल्याचे सांगितले. म्हणून त्यांना चोरी केलेले सोन्याचे दागिने व पैसें कोठे आहे ? याबाबत विचारले असता त्यांनी घरात ते लपवून ठेवल्याचे सांगितल्याने 1,32,300/- रु कि. सोन्याचे दागिने व 1100/- रुपये रोख असा एकुण 1,33,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे, पोलीस उप निरीक्षक श्री. जितेंद्र पाटील, पोलीस नाईक संदीप लांडगे, पोलीस अंमलदार मुकेश राठोड भरत उगले, किरण जिरेमाळी, अजित नागलोत यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments