Header Ads Widget


समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे युवक-युवती मार्गदर्शन कार्यशाळा..

युवकांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावे;व्याख्याते तथा कर सहाय्यक किशोर निकम..
      राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने युवा रंग फाउंडेशन,व समाजकार्य महाविद्यालय तळोदतील राष्ट्रीय सेवा योजना विभाग,समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय युवक-युवती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उषा वसावे होते,प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार जिल्हा कर सहाय्यक किशोर निकम,नीलचंद्र शेंडे,पी.आर.बोबडे,डॉ.एन.एस शर्मा,जितेंद्र लुडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
 युवक युवती मार्गदर्शन कार्यशाळेत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी किशोर निकम यांनी करिअर गाईड संबंधात सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले भारत देश हा अनेक संत, महापुरुषांनी बनलेला देश आहे. ज्यांचे विचार आपल्याला कित्येक पिढ्या प्रेरणा देत आले आहेत. या महापुरुषांच्या विचारांमुळे आपल्याला एक सकारात्मक संदेश मिळत असतो. संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य खचून जातो, निराश होतो. तेव्हा आपण महापुरुषांचे विचार वाचतो आणि त्यामुळे पु्हा एकदा लढण्याचे बळ मिळते. आज स्वामी विवेकानंद यांची १६० वी जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांना अतिशय कमी आयुष्य लाभले. तरिही आपल्या ज्ञानाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी खूप मौल्यवान विचार युवा पिढीला दिले आहेत. जे तरुणांचे जीवन उजळून काढण्याची क्षमता ठेवतात. तर आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आत्मसात करून घेणार आहोत.ज्याने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळेल.
दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उषा वसावे यांनी अध्यक्ष्यीन भाषण दिले,त्या म्हणाल्या, महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्य रुजवले,ज्या माऊलीने विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषास जन्मास घालून त्यांच्यात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज पेरून स्वराज्याची पेरणी केली त्या माऊली म्हणजे राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व जगभरातील युवकांना प्रेरणादायी स्वामी विवेकानंद यांची आज जयंती,आपण त्यांची मात्र जयंती साजरी होऊन चालणार नाही तर दैनंदिन जीवनात त्यांचे विचार अंगी करून जीवनात यशस्वी व्हा. कार्यक्रमाच्या दरम्यान निलचंद्र शेंडे,पी.आर.बोबडे,डॉ.एन.एस शर्मा,जितेंद्र लुळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रामचंद्र परदेशी यांनी केले,परिचय प्रा.निलेश गायकवाड यांनी केले,प्रस्तावना प्रा.निलेश तायडे तर आभार प्रदर्शन प्रा.वसावेसर यांनी केले.

चौकट
•स्वामी विवेकानंद यांनी युवा पिढी घडली पाहिजे यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.जसे तुमचा विकास आतून झाला पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही.तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही.
•राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्याकाळात गृहस्थी सांभाळत ज्याप्रकारे शिकवण दिली, त्यामधून आपण त्यांच्या बोध घेतला पाहिजे.प्रत्येकाने महापुरुषांच्या जयंती निमित्त उत्सवच नाही तर त्यांचे विचारही आत्मसात केले पाहिजे..
( प्राचार्य-उषा वसावे समाजकार्य 
महाविद्यालयात,तळोदा  )

फोटो-समाजकार्य महाविद्यालयात तळोदा  येथे  नंदुरबार जिल्हा कर सहाय्यक किशोर निकम.

Post a Comment

0 Comments

|