Header Ads Widget


पिंपळनेर शहर तसेच सामोडे गावात घरफोडी चोरी करणारी टोळी जेरबंद, रोख मुद्देमाल हस्तगत; पिंपळनेर पोलिसांची कामगिरी..

Breking Bulletin...


साक्री! Sakri/ LivenationNews 
प्रतिनिधी /अकील शहा


साक्री , दि.३१/१२/२०२२ रोजी पिंपळनेर शहरातील हरी ओम नगर येथील श्री दिलीप आनंदा महाजन यांचे राहते घरी बंद घराचे कुलूप तोडून घरपोडी चोरी केल्याने पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सी.सी.टी.एन.एस. गुरनं ०२/२०२३ भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच सामोडे गावात दि.०९/०१/२०२३ रोजीचे रात्री ०९:०० ते दि.१०/०१/२०२३ सकाळी ०७:०० वाजेच्या  दरम्यान एकाच रात्री पाच ठिकाणी वेगवेगळ्या बंद घरात चोरीचा प्रकार झालेला होता त्याबाबत पिंपरी पोलीस स्टेशन येथे दि.१३/०१/२०२३ रोजी तक्रारदार श्री.किरण विलास घरटे (वय२८) धंदा शेती राहणार सामोडे तालुका साक्री यांनी तक्रार दिल्याने सी.सी.टी.एन.एस.गुरनं-०८/२०२३ भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

  पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सन  २०२३ च्या सुरुवातीच्या महिन्यात घरपोडी चोरी करणारी टोळी पिंपळनेर शहर व तसेच सामोरे गाव परिसरात बंद घरांना टार्गेट करून जनतेचे मालमत्तेचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर मालमत्ते संदर्भात गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांनी सदर गुन्हे तात्काळ उघडकीस आणणे तसेच मालमत्तेचे गुन्हे प्रतिबंध होणे बाबत विशेष सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत सदर गुन्हे उघडकीस आणणे करिता विशेष पथक नेमण्यात आले होते, रात्रगस्त पेट्रोलिंग सक्तपणे करून गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी अतिरिक्त पोलीस अंमलदार नेमण्यात आले होते.
  सदर दाखल गुन्ह्यांचे तपासाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रुपेश शशी पवार वय १८ वर्षे ३ महिने याचे सोबत ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले होते त्यांना विश्वासात घेऊन वरील गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपींकडून गुन्ह्यातील २५,००० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तसेच सदर आरोपींतांची घोरपडी चोरी करून मोजमजा करण्याच्या सवयीचे असल्याने त्याकरिता त्यांनी घरफोडी चोरी केल्याची केल्याची तपासात कबूल केली आहे.
 सदर गुन्ह्याचे तपासात वरील तीनही विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले असून मा.बाल न्यायालय धुळे येथे हजर करण्यात आले होते तसेच आरोपी रुपेश शशी पवार राहणार पिंपळनेर यास अटक करण्यात आली असून साथीदार पवन उर्फ पांग्या उत्तम भवरे याचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर मालमत्ते संदर्भातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
 अशाप्रकारे पिंपळनेर शहरातील तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात येते की, सदर आरोपीतांची गुन्हे करण्याची पद्धत ही बंद घरावर पाळत ठेवून रात्री चोरी करण्याची असल्याने गावी जात असताना आपले घर अगर परिसरात रात्रीची लाईट लावणे, शेजारील राहणारे लोकांचे मोबाईल नंबर जवळ बाळगणे, बाहेरगावी जाताना सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम घरात न ठेवता बँक अगर सुरक्षित ठिकाणी आजूबाजूला कॉलनी अगर परिसरात कोणीही संशयित इसम दिसून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन अगर डायल ११२ वर संपर्क करून सदर बाबत माहिती द्यावी.
 सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप मैराळे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके,पोसई बी.एम.माळचे, असई बी.आर.पिंपळे,पोहेकाँ कांतीलाल अहिरे,पोना प्रकाश मालचे,पोकाँ हेमंत पाटोळे,पोकाँ राकेश बोरसे चालक पोकाँ रवींद्र सूर्यवंशी, चालक पंकज वाघ,पोकाँ विजय कुमार पाटील, पोकाँ सोमनाथ चालक पोकाँ नरेंद्र परदेशी अशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|