Header Ads Widget


साक्री तालुक्यातील तामसाडी माध्यमिक विद्यालय येथे , ४३ वे तालुकास्तरीय भव्य विज्ञान प्रदर्शन

साक्री प्रतिनिधी : अकील शहा
पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तामसवाडी तालुका साक्री येथील माध्यमिक विद्यालयात ४३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन दि.१३ व १४ जानेवारी रोजी होत आहे, दि.१३ जानेवारी रोजी प्रदर्शनाचे उद्दघाटक शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, प.स. साक्री गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी, डॉक्टर दिलीप चोरडिया,उपशिक्षणाधिकारीएस. ई. बागुल, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे , सुरेंद्र मराठे, अँड. मोहन साळुंके, जगदीश वाघ, आबासाहेब सोनवणे सुनील सोनगिरे ,सुनंदा जगताप, डॉ. अनिल नांद्रे,पी.झेड.कुवर आदी उपस्थित होते, प्रदर्शनाचे समारोप आणि पारितोषिक वितरण ठाणे येथील जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, नाशिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुभाष बोरसे,वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. व्ही. पाटील, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुवर, प्राचार्य बी.एस.पाटील, मुख्याध्यापक जितेंद्र मराठे, औरंगाबाद येथील उद्योजक जितेंद्र साळुंखे ,धुळे येथील सहकार अधिकारी गिरीश महाले , विजय बोरसे ,उदय तोरवणे ,अरुण नेरकर जगदीश शिंदे,आर. एल. बोरसे, एन.के.दशपुते,आर. जे.पाटील, सुहास सोनवणे,एल.बी.मोरे,के.एस. जाधव, अँड.कुंदन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन तामसवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एस. साळुंके व साक्री तालुका विज्ञान मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments

|