Header Ads Widget


उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे.नंदुरबार जिल्ह्यात पुढील दोन दिवस थंडीची लाट...

 

नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews
प्रतिनिधी /सईद कुरेशी 

  
          नंदूरबार, उत्तरेकडील राज्यापासुन मध्य भारतापर्यंत सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जिल्हा कृषि हवामान केंद्र कृषि विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार येथे आज दि. 9 जानेवारी रोजी निच्चांकी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन ते दिवस थंडीची लाट असेल आणि हवामान कोरडे राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे अशी माहिती कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली आहे.


 शेतकरी बांधवांनी थंडीची लाटेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांना हलके पाणी द्यावे जेणेकरून शेताचे तापमान नियंत्रित राहील व पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल. शक्य असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. साधारणपणे केळी व पपई या फळबागांच्या पिकासाठी कडाक्याच्या थंडीचा विपरीत परिणाम होऊन, नुकसान होण्याची शक्यता असते. केळी पपईच्या फळांना संरक्षणासाठी प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे.  बागेच्या भोवती सजीव कुंपण लावून, थंड वार्‍यापासून बागेचे संरक्षण करावे. बागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळी पाणी द्यावे ज्यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते. झाडांच्या आळ्यात व खड्ड्यात जवळ वाळलेला पालापाचोळा टाकावा. उसाचे पाचट किंवा गव्हाचा भुसा यांचा उपयोग करावा. त्यामुळे थंड तापमानाचा झाडाच्या मुळावर परिणाम होत नाही.

 तसेच थंड वाऱ्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे. शेडमध्ये तापमान वाढवण्यासाठी बल्ब लावावेत आणि शेडला पडदे लावावेत. जनावरांना उर्जा व प्रथिनेयुक्त पशु आहाराचा समावेश करून आहार वाढवावा असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्राने केले आहे.

Post a Comment

0 Comments

|