Header Ads Widget


नवापूर तालुक्यातील भांगडा वनपरिक्षेत्र हद्दीतून अवैध उत्खनन करताना 25-30 लक्ष रुपये किंमतीचे जेसीबी मशीन जप्त..



नवापुर ! Navapur/ LivenationNews

प्रतिनिधी /समीर पठाण




नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भांगडा वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक 34 मध्ये बेकायदेशीररित्या जेसीबी मशीनच्या साह्याने अवैध उत्खनन होत असल्याची माहिती नवापूर वनक्षेत्रपाल यांना गुप्त माहितीनुसार, त्यांनी वनपरिक्षेत्र हद्द भांगडा कक्ष क्रमांक 34 मध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, सदर ठिकाणी जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले असता, त्यांनी वनपरिक्षेत्र स्टॉप रोहयो नंदुरबार व वनक्षेत्र स्टॉप नवापूर प्रादेशिक यांच्यासह वनपरिक्षेत्र नंदुरबार परीमंडळ भांगडा नियतक्षेत्र यांनी जेसीबी मशीनसह चालकास ताब्यात घेऊन जेसीबी मशीन नवापूर विक्री आगार येथे आणून जप्त केले असून, त्या जेसीबी मशीनची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत 25 ते 30 लक्ष रुपये असून, सदर जेसीबी मशीन हे नंदूरबार तालुक्यातील ठेकेदाराचे असल्याची चर्चा आहे सखोल चौकशी अंती जेसीबी मालकाचे नाव उघड होण्याची शक्यता आहे,
सदर गुन्ह्याची वनरक्षक भांगडा यांनी 01 / 2023 दिनांक 8 जानेवारी 2023 चा गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर रोजगार हमी योजना स्नेहल अवसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भांगडा करीत असून, सदरची कारवाई वनक्षेत्रपाल नवापूर स्नेहल अवसरमल, वनरक्षक अरविंद निकम, किसन वसावे, नैना हडस, वनपाल खेकडा भिवाजी दराडे, वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, अनिल वळवी, अमोल गावित, गिरीश वळवी, उदयसिंग पाडवी, दिपाली पाटील, भाग्यश्री पावरा, वाहन चालक रवी गिरासे, दिलीप गुरव व रोजगार हमी योजना वनपरिक्षेत्रातील सर्व संरक्षण मजूर यांनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला होता, सदरची कारवाई वनसंरक्षक धुळे होशिंग, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग कृष्णा भवर, विभागीय वनअधिकारी संजय पाटील दक्षता पथक धुळे व सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, नवापूर वनक्षेत्रपाल यांच्याकडून आवाहन करण्यात येते आहे की वन्य व वन्यजीव तसेच अवैध लाकूड वाहतूक संबंधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1926 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|