Header Ads Widget


महावितरणची कंबरतोड प्रस्तावित दरवाढ

LiveNationNews Bulletin

महावितरणने २०२३-२४ साठी ३७% वीज दरवाढीचा कंबरतोड प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे ज्यामुळे आजच देशातील सर्वात जास्त दर असणार्या महाराष्ट्रातील ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरमहा दीडशे ते  तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणार्या घरगुती  ग्राहकांना ४०० ते ८०० रुपयांपर्यंत अतिरिक्त झटका बसणार आहे तर ३०० युनिट पेक्षा जास्त वीज वापर असणार्या घरगुती ग्राहकांना ८०० ते १७०० रुपयांपर्यंत दरवाढ सोसावी लागणार आहे. व्यापारी , छोटे उद्योजक यांनाही मोठी झळ बसणार आहे तर मोठ्या उद्योगांनाही जवळपास ३० % दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. यातून नवीन उद्योग महाराष्ट्रात येणं तर सोडाच आहेत तेही महाराष्ट्रातून पळ काढण्याची भिती आहे. व्यापारी व औद्योगिक दरवाढीचा अंतिम भार सामान्य माणसालाच झेलावा लागत असल्याने आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाचे कंबरडे मोडणार आहे. 

नागरीकांना आमचे आवाहन आहे की या प्रस्तावित दरवाढीला ऑन लाईन पध्दतीने १५ फेब्रुवारी पर्यंत


या संकेतस्थळावर हरकती नोंदवता येणार आहेत त्याचा उपयोग करुन मोठ्या संख्येने या हरकती नोंदवाव्यात.

Post a Comment

0 Comments

|