LiveNationNews Bulletin
नंदुरबार जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचे नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्थेसोबत सामाजिक बांधीलकी देखील जपत आहेत. पोलीस व जनता यांच्यातील संबंध वृध्द्ींगत व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधीलकीची प्रचिती एका कुटुंबीयांना अनुभवायला मिळाली आहे.
दिनांक 29/01/2023 रोजी रात्रौ 09.30 वा. सुमारास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना एका गावाचे पोलीस पाटील यांनी दुरध्वनीद्वारे कळविले की, खेतिया ते शहादा रोडवर रायखेड गावाजवळ एक अनोळखी महिला मिळून आली असून ती काहीच बोलत नाही. त्यावरुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांना कळवून तात्काळ त्याठिकाणी पाठवून घटनेबाबत संपूर्ण माहिती घेणेबाबत सांगितले.
म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांनी खेतिया ते शहादा रोडवर त्या महिलेचा शोध घेतला असता ती महिला मिळून आली त्या महिलेस तिचे नाव गाव तसेच इतर माहिती विचारली असता परंतु तिचे बोलणे अस्पष्ट असल्यामुळे पोलीसांना ते समजत नव्हते. सदर घटनेबाबत म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना कळविली असता त्यांनी सदर महिलेला पुढील औषधोपचाराकामी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल करुन औषधोपचार करुन त्या महिलेची ओळख पटवून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुखरुप देणेेबाबत सांगितले.
म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांनी त्या महिलेला औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल केले, परंतु तेथे देखील डॉक्टरांनी ती महिला मनोरुग्ण असल्याचे सांगितल्याने त्या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांनी त्यांच्या अधिनस्त असलेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांना याबाबत समाजमाध्यमातून माहिती देवून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले. तसेच सदरची महिला मिळून आल्यापासून दोन दिवसांचा कालावधी उलटला होता. तरी देखील त्या महिलेबाबत काहीच माहिती मिळून येत नव्हती.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्याची सिमा लागून असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग किंवा अपहरण झालेल्या महिलांबाबत माहिती घेण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले. तरी देखील काहीच हाती काहीच येत नव्हते.
दिनांक 31/01/2023 रोजी सदर महिलेला जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे डिस्चार्ज दिल्यानंतर म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार व त्यांच्या अंमलदारांनी सदर महिलेला आपुलकीने तिच्याबाबत विचारपूस केली असता तिने अडखळत तिच्या गावाचे नाव सांगितले. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस पाटील व इतर नागरिकांना संपर्क साधला असता सदर महिला त्याच गावाची असून दिनांक 29/01/2023 रोजी सायंकाळच्या सुमारास घरातून निघून गेल्याचे सांगितले.
पोलीसांनी तात्काळ त्या महिलेच्या कुटुंबीयांना म्हसावद पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. कुटुंबीयांनी त्या महिलेला पाहाताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. महिलेची ओळख पटल्यानंतर त्या महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी सुखरुप ताब्यात मिळाल्यानंतर त्या महिलेच्या वडिलांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचेसह म्हसावद पोलीसांचे आभार व्यक्त केले.
कायदा व सुव्यवस्था राखतांना नेहमीच रस्त्यावर / चौकात उभे राहुन कारवाई किंवा लाठी उगारणाऱ्या पोलीस आपल्यांना पहायला मिळातो, परंतु खाकी वर्दीच्या आड असलेला एक माणुसकीचा चेहरा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवायला मिळालेला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची समाजाप्रती असलेली तळमळ, समाजिक बांधिलकी त्यांच्या कर्तृत्वाने आज पुन्हा एकदा सर्वांनी पाहावयाला मिळाली आहे.
0 Comments