Header Ads Widget


अवैध जुगार खेळणाऱ्यांवर धाड.

 


वाशिम, दि. २३/०१/२०२३.

समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मंगरूळपीर व पोलीस स्टेशन मंगरूळपीर यांच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला वरली मटका जुगार खेळत असतांना पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतील ग्राम किन्हीराजा येथे धाड टाकून २० आरोपींसह ३,०८,४३०/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा चार्ज मंगरूळपीर श्री.जगदीश पांडे यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम राजाकिन्ही येथे पंचांसह जावून आठवडी बाजार जवळील एका विटा सिमेंटच्या टिन पत्राच्या खोलीमध्ये काही इसम प्रतिबंधित वरली मटक्याच्या पैश्यांचा हारजीतवर जुगार खेळतांना दिसले. त्यांच्यावर धाड टाकत २० आरोपींकडून नगदी ४७,४३०/- रुपये, २० मोबाईल फोन अं.किं.६१,०००/-रु. व ४ मोटार सायकली अं.किं.२,००,०००/-रु. असा एकूण ३,०८,४३०/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींवर पो.स्टे.मंगरूळपीर येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांचे सोबत सपोनि.मंजुषा मोरे, सपोउपनि.माणिक च
व्हाण, पोकॉ.इस्माईल कालीवाले, पोकॉ.रामेश्वर राऊत, पोकॉ.मंगेश गादेकर, मपोकॉ.रुपाली वाकोडे यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

|