LiveNationNews Bulletin
कोल्हापूर, दि. २३/०१/२०२३.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालाविरुध्दचे घडणारे गुन्हे उघडकीस आणणेसह प्रतिबंध करणे तसेच इतर अवैद्य व्यवसायाबाबत माहिती मिळवून कारवाई करणेकरीता पोलीस अधीक्षक, श्री शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेप्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना तपास पथके नेमूण सक्त पेट्रेालींग करुन व गोपनीयरित्या माहिती काढून तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन कारवाई करणेकरीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री संजय गोर्ले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी पोलीस उप निरीक्षक,शेषराज मोरे यांचे तपास पथक नेमून त्यांना माहिती काढून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे माहिती काढत असताना पथकातील पोलीस अमंलदार विजय गुरखे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पांढ-या रंगाची हुडाई कंपनीच्या क्रेटा कार मधून बनावट नोटा घेवून काही इसम कळे ते कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली, अशी माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे तसेच पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील व रफिक आवळकर यांचे पथकाने कोल्हापूर ते गगनबावडा जाणारे रोडवरील मरळी फाटा, ता. पन्हाळा, जि.केाल्हापूर रोडवर सापळा लावून क्रेटा कार आडवून सदर कारची व कारमधील ०५ इसम यांच्या घरामध्ये एकूण ४,४५,९००/- रुपये किमंतीच्या ५००/- व १००/- रुपयाचे बनावट नोटा मिळून आल्या. बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह , क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून यांचेवर कळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,श्री शैलेश बलकवडे , अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखे कडील पोलीस निरीक्षक श्री संजय गोर्ले, पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे,विनायक सपाटे, पोलीस अमंलदार विजय गुरखे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील व रफिक आवळकर व सायबर पोलीस ठाणेकडील अमर वासूदेव व सुरेश राठोड यांनी केली आहे.
0 Comments