Header Ads Widget


नांदेड येथे माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा जल्लोषात संपन्न

माहिती अधिकार कायदा वाचवण्यासाठी प्राण पणाला लावू- सुभाष बसवेकर

नांदेड : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन च्या वतीने  मराठवाडा स्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा जल्लोषात संपन्न झाला.
या मेळाव्यात अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काम करताना येणाऱ्या अडचणी व उपाय या वर मनोगत व्यक्त केले.

या वेळी बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे अध्यक्ष सुभाष बसवेकर म्हणाले की शासन प्रशासन याना माहिती अधिकार कायदा नको आहे
ते कायदा संपवायला निघाले आहेत. पण जनतेचा कायदा आता जनतेने एकत्र येऊन वाचवला पाहिजे.
आमचे प्राण गेले तरी चालतील पण आम्ही हा कायदा वाचवू

यावेळी लातूर जिल्हा कार्यध्यक्ष दत्तात्रय बेंबडे यांनी कार्यकर्ते जोडून संघटना वाढविणार अशी घोषणा केली. हिंगोली जिल्हा अध्यक्ष पंडित तिडके यांनी यांनी कायद्याचा नेमका कसा वापर करावा हे सांगितले. परभणीचे कार्यकर्ते व पत्रकार विठ्ठल साळवे यांनी कार्यकर्त्याना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी हे सांगितले.
जालना जिल्हा अध्यक्ष सखाराम घोडके यांनी मनगट व्यक्त केले. मोतीराम काळे यांनी खुमासदार शैलीत त्यांचे अनुभव सांगितले.
या मेळाव्यात अजित गट्टाणी यांची नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले.
या मेळाव्यासाठी मराठवाड्यातून सर्व जिल्ह्यातून 60 कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|