नंदुरबार येथे आयोजित मुस्लिम समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा विवाह संपन्न,इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम.
नंदुरबार येथील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या सर्व मुस्लिम समाजबांधवांतील नऊ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला, या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व यश मिळविणार्या समाजबांधवांचा स्मृतीचिन्ह देवुन सन्मान झाला.
तसेच इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
नंदुरबार येथील बादशाह नगर मैदानात इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या विद्यमाने सामुहिक विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाशमी कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद मोहम्मद हाशमीमींया (पीर बापु कादरी) होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, माजी नगरसेवक संजय सोनार, मोहन श्रॉफ, इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, हाशमी कमिटीचे गनीभाई मेमन, मनोज चौधरी, मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र चौधरी, भिल प्रदेश बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडीत तडवी, माजी नगरसेवक अकबर शेख, डॉक्टर फरीद बागवान, हाजी गफार मस्तान, सिरत कमिटीचे चेअरमन सैय्यद मुस्तफा, उपाध्यक्ष सैय्यद याकुब, हाजी फारुक खाटीक आदी उपस्थित होते, या सोहळ्यात महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील मुस्लिम समाजातील एकुण नऊ वधू-वरांचा विवाह लावण्यात आला, यावेळी मदनी मस्जिदचे मुफ्ती उसामा कास्मी, जामा मस्जिदचे मौलाना आदील खाटीक यांनी मुस्लिम धार्मिक पध्दतीने विवाह लावला, तसेच नवविवाहित जोडप्यांना
घरसंसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्यात, यावेळी इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी प्रास्ताविकातून सामुहिक विवाह सोहळ्यासह फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली, तसेच यापुढे सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार असल्याचे एजाज बागवान यांनी सांगितले, हाशमी कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद मोहम्मद हाशमीमींया यांनी केलेल्या मार्गदर्शनातून समाजासाठी सामुहिक विवाह काळाची गरज असल्याचे सांगितले, तसेच समाजाच्या
प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित व्हावे, असे आवाहन केले, या कार्यक्रमाचे औचित्य साधून इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले, तसेच विविध क्षेत्रात यश मिळविणार्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आसिफ पठाण यांनी केले, आभार एजाज बागवान यांनी मानले, या कार्यक्रमास मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष
असलम चौधरी, मुस्तफा चौधरी, नासिर बागवान, जमील खाटीक, शाकीर बागवान, सचिव दानिश बागवान, इरफान खाटीक, छन्नु पठाण, रिजवान बागवान, मकसुद सैय्यद आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments