Header Ads Widget


शहादा येथे हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन संपन्न..




शहादा/Shahada LivenationNews

प्रतिनिधी/ शेख मुजाहीद

शहादा शहरात डॉ.झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी,शहादा,संचलित,के.जी.एम. नॅशनल हायस्कूल व गर्ल्स हायस्कूल,शहादा,येथे हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन,संस्थेचे अध्यक्ष,अॅड, काझी,अहमद मुजतबा मोहम्मद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस संस्थेचे उपाध्यक्ष, हाजी मजीद खान व संस्थेचे उपाध्यक्ष,हाजी इस्माईल मंसूरी सचिव, डॉ.एच.आर. शहा,
खजिनदार हाजी फारूक ईसानी, संचालक प्रो.हाजी हाफीज खान, कारी सरफुद्दीन, माजी मुख्याध्यापक आरिफ शहा सर,मसूद अन्सारी,सरकारी वकील ॲड असीम शेख,अॅड महफुज अली, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक मोहसीन खान मो.रफीक देशमुख, यांच्या हस्ते मान्यवरांच्या सत्कार करण्यात आले.तसेच शहादा शहरातील पत्रकार बंधू राजू मंन्सुरी व एन.डी.टी.चे प्रतिनिधी मुजाहिद बेग, यांच्याही त्यावेळेस सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून आला.

विद्यार्थिनी चार्जेस मॉडेल विज्ञान उपकरण आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून प्रदर्शित केले त्याचप्रमाणे हस्तकला व चित्रकलेसाठी शिक्षक कलीम मंसुरी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|