Header Ads Widget


दुखापत करणाऱ्यावर गुन्हा दाखल.


LiveNationNews Bulletin

नागपूर, दि. २५/०१/२०२३.

पो.स्टे. भिवापूर वणी येथे फिर्यादी हा आपल्या मिस्त्रीच्या कामावरून घरी आला असता गावातील चैकात बोरींग जवळ त्याचा मित्र याचे सोबत बोलत बसला होता त्या ठिकाणी आरोपी क्र. 1) विधीसंघर्ष बालक हा मोटरसायकलने आला व त्याने फिर्यादीला विनाकारण शिवीगाळ केली त्यास फिर्यादीने ‘‘तु कोणाला शिवीगाळ केली’’ असे हटकले असता त्याने ‘‘तुला शिवीगाळ केली’’ असे म्हटले असता तेव्हा फिर्यादीने त्याला एक थापड मारली व पुन्हा शिवीगाळ करायची नाही असे म्हटले व फिर्यादी आपले घरी निघुन गेले.

आरोपी विधीसंघर्ष बालक व त्याचे सोबत आरोपी क्र. 2) हे दोघेही फिर्यादीचे घरा समोर आले व शिवीगाळ करत होते तेव्हा फिर्यादी घराचे बाहेर निघाले असता आरोपीने आपल्या हातातील तलवार फिर्यादीला मारण्यास उगारली असता फिर्यादीने लोखंडी तलवार आपल्या डाव्या हाताने अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिर्यादीच्या डाव्या हाताला अंगठया जवळ बोटाला जखम झाली व फिर्यादी हे ओरडले असता गावातील लोक धावुन आले लोखंडी तलवार सोडून आरोपी व विधीसंघर्ष बालक हे फिर्यादीला ‘‘तु बाहेर भेट तुला जिवाने मारून टाकतो’’ अशी धमकी देवुन पळुन गेले.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. विधीसंघर्ष बालक यास सुचनापत्र हजर बाबत त्याचे वडीलांना दिले. आरोपी क्र. 2) याला सुचनापत्रावर रिहा करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंगोले पो.स्टे. भिवापुर हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments

|