Header Ads Widget


विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल.


LiveNationNews Bulletin

नागपूर, दि. २५/०१/२०२३.

पो.स्टे. जलालखेडा फिर्यादी/पीडिता वय 36 वर्ष व आरोपी हे सख्खे चुलत नातेवाईक असुन एकाच मोहल्ल्यात राहतात आरोपी हा दारू पिण्याच्या सवईचा असुन यांच्यात जुने वाद आहे. नमुद घटना तारखेला फिर्यादी ही तिच्या घराच्या वरच्या रूममध्ये तिचे मुलीसह झोपली असताना आरोपी हा दिवाकर पेठे हयाच्या घरावर चढुन फिर्यादीच्या घराच्या वरच्या रूममध्ये आला. तेव्हा तो दारूचे नशेत होता फिर्यादीने त्यास अचानक तिचे रूममध्ये पाहील्याने त्यास विचारले की ‘‘तु माझ्या घरात रूममध्ये काय करत आहे’’ तेव्हा त्याने फिर्यादीचे अंगावर धावुन शिवीगाळ करून फिर्यादी याचा हात पकडुन विनंयभंग केला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. जलालखेडा येथे आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध सुरू असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार ललीता बन्सोड ब. नं. 1291 या करीत आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Sunday, April 13. | 7:08:46 AM