Header Ads Widget


सराईत चोर जेरबंद व मुद्देमाल जप्त.

LiveNationNews Bulletin

पुणे शहर, दि. १९/०१/२०२३
युनिट-02 चे प्रभारी अधिकारी श्री.क्रांतीकुमार पाटील, पोउपनिरी. नितीन कांबळे व युनिट-2 कडील पोलीस अंमलदार हे युनिट-2 चे हददीत बस मधील चोरी, वाहन चोरीचे व गुन्हे प्रतिबधंक गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार, कादिर शेख व समिर पटेल यांना बातमी मिळाली की, एक बसमधील चोरी करणारा इसम चोरीच्या उददेशाने गोळीबार मैदान येथे थांबला आहे.
युनिट-2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमी व वर्णनाप्रमाणे गोळीबार मैदान येथे थांबलेला आरोपीस ताब्यात घेवुन, त्याचेकडुन 01 होंडा युनिकॉन मोटार सायकल व 01 वन प्लस मोबाईल फोन असा एकुण 45,000/- रु. पंचनाम्याने जप्त केला आहे. सदर मिळालेल्या मोटार सायकलबाबत लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. त्याचेकडील मोबाईल फोन बाबत तपास चालु आहे. आरोपी हा बस मध्ये चोरी करणारा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याची वैदयकिय तपासणी करुन लष्कर पोलीस स्टेशन येथे पुढील कायदेशीर कारवाई कामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त,श्री.रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त,गुन्हे, श्री.रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,श्री.अमोल झेंडे, सहा.पो. आयुक्त गुन्हे, श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक,क्रांतीकुमार पाटील,गुन्हे शाखा, युनिट-2,पुणे शहर, पोउपनिरी. नितीन कांबळे, पोलीस अमंलदार, शंकर नेवसे ,राहुल राजपुरे, कादिर शेख, समीर पटेल, कादीर शेख,निखिल जाधव, साधना ताम्हाणे, गजाजन सोनुने व नागनाथ राख यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, April 10. | 4:56:27 PM