Header Ads Widget


फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.


LiveNationNews Bulletin

रायगड, दि. १९/०१/२०२३.
१. खोपोली पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी याचे रहात्या घरी फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहणारे असून एकमेकाच्या परिचयाचे आहेत. आरोपीतानी आपसात संगणमत करून आपल्या गावाकडील जमीनीची केस कोर्टात सुरू आहे व केसच्या खर्चासाठी पैशाची आवश्यकता आहे असे खोटे कारण सांगून फिर्यादी व अन्य एकूण 12 साक्षीदार यांचेकडून एकूण रक्कम 28,55,000/- रूपये रक्कम स्विकारली केसचा निकाल लागल्यानंतर जमीन नावावर झाली की सर्वांचे घेतलेले पैसे परत करण्याचे खोटे आश्वासन दिले, प्रत्यक्षात अशी कोणतीही केस कोर्टात सुरू नसल्याचे फिर्यादी व साक्षीदार यांच्या लक्षात आल्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांनी आरोपीकडे घेतलेल्या रक्कमेची मागणी केली असता आरोपीने सुरूवातीस टाळाटाळ केली, त्यानंतर फिर्यादी यांचे नावे 28,55,000/- रूपये रक्कमेचा चेक दिला असून सदर चेक देखील बाऊस झालेला आहे. अशा प्रकारे फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादी व अन्य 12 साक्षीदार यांची 28,55,000/-रूपये रक्कमेची फसवणूक करून सदर रक्कम स्वत:च्या फयदयासाठी वापरून त्याचा अपहार केला.
याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोसई/श्री.सुधाकर लहाने हे करीत आहेत.
२. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत महिला फिर्यादी रा.दस्तूरी नाका, ता.महाड या घरी असताना दोन अज्ञात इसम हे फिर्यादी यांच्या घरी येवून त्यांना सोन्याचे दागिने पॅालिश करून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांचेकडून अंगावरील एकुण 1,75,000/-रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेवून दागिन्याला लाल रंग लावून ते कागदावर ठेवून फिर्यादी यांना हळद आणण्यास सांगुन सदरचे सोन्याचे दागिने घेवून पळून जावून फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली.
याबाबत महाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोसई श्री.विशाल पवार हे करीत आहेत.
३. खोपोली पोलीस ठाणे हद्दीत येथे फिर्यादी रा.नवी मुंबई व आरोपी क्र.1 हे जि.प.रायगड यांचे आस्थापनेवर प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत असुन एकमेकाच्या परिचयाचे आहेत.आरोपी क्र.01 व 02 रा.खोपोली,ता.खालापूर हे नात्याने सख्खे भाऊ असुन व्ही.एन.एच.इन्फ्रामेक प्रा.लि.या संस्थेचे भागीदार व संचालक आहेत. गुन्ह्यातील आरोपींनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांना व्ही.एन.एच.इन्फ्रामेक या कंपनीच्या वतीने फ्लॅट क्र.जे-410,4 था मजला,माउंटन व्ह्यु रेसिडेन्सी हा फ्लॅट कमी किंमतीमध्ये खरेदी करुन तो बाजारभावाने जास्त किंमतीमध्ये विक्री करुन त्यामधुन येणारा नफा हा वाटुन घेवु किंवा सदर फ्लॅट नावावर करुन देवु असे आमीष दाखवुन फिर्यादी यांचे कडुन चेकव्दारे व ऑनलाईन रक्कम स्वीकारली व त्याबाबत हमीपञ लिहुन दिले परंतु प्रत्यक्षात फिर्यादी यांचेकडुन घेतलेल्या रक्कमेतुन केलेला फ्लॅट खरेदी किंवा विक्री केलेला नाही, किंवा फिर्यादी यांना कोणताही नफा दिलेला नाही किंवा सदर फ्लॅट फिर्यादी यांच्या नावावर करुन दिलेला नाही. फिर्यादी यांनी आरोपीस दिलेल्या रक्कमेची मागणी केली असता दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांना चेक दिलेले असुन ते बाऊन्स झालेले आहेत.
याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि/श्री.हरीश काळसेकर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|