Header Ads Widget


महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकीचा फोन

 Sikandar Shaikh : कुस्तीप्रेमींकडून सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ उगाच झाला नाही.माझ्यासोबत जे काय झालं ते चुकीचं झालं. केवळ फ्रंट कॅमेरा ने पाहून निर्णय घेण्यात आला, बॅक कॅमेराने पाहिला नाही.माझ्या कोचला देखील बोलताना तिथून हाकलून लावलं.काय चुकीचं करताय काय बरोबर करताय सर्वांना दिसत आहे. गायकवाडला दिलेले गुण हे दोघांचेही खरंतर तीन – चार ने कुस्ती चालणे अपेक्षित होते पण तस झालं नाही.या सगळ्या नंतर मी खचलो नाही पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी जिंकूणच कोल्हापुरात येईऩ अशी प्रतिक्रिया पैलवान सिकंदर शेख याने दिली.आज तो कोल्हापुरात दाखल झाला यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र केसरीचे पंच मारुती सातव यांना पैलवान संग्राम कांबळे यांनी धमकीचा फोन केला यासंदर्भात बोलताना सिकंदर म्हणाला की, संग्राम कांबळे यांनी कोणतीही धमकी दिली नाही.ती रेकॉर्डिंग मी ऐकलेली आहे त्यामध्ये कोणतीही शिवीगाळ नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कोणताही गोष्ट तेथे घडलेली नाही.प्रत्येक पैलवानाला अन्यायाबद्दल विचारण्याचा हक्क आहे.माझ्यावर प्रेम करणारे सर्व फोन करून विचारतात.आज हे विचारलं नाही तर पुढच्या काळातही हे चालत राहील.मी आतापर्यंत खूप वेळा हरलो आहे मात्र माझा संघर्ष सुरूच राहील. माझी हार माझे आई-वडील आणि कोच सहन करू शकले नाहीत ते अजून सुद्धा दुःखात असल्याचे सिंकदर याने म्हटलं आहे.


पंच मारुती सातव यांना धमकीचा फोन आला या फोनमध्ये नेमकं संभाषण काय झालं,जाणून घ्या.

पै संग्राम कांबळे : पैलवान संग्राम कांबळे बोलतोय
पंच मारुती सातव : हो, बोला की!
पै संग्राम कांबळे : सिकंदरच्या कुस्तीला तुम्हीच पंच होता ना?
पंच मारुती सातव : हो..हो…
पै संग्राम कांबळे : तुम्हाला मुलगा आहे की, मुलगी आहे?
का?
पै संग्राम कांबळे : सांगा की!
पंच मारुती सातव :बोला की तुम्ही, तुम्हाला काय म्हणायचंय? मुलगा आहे
पै संग्राम कांबळे : त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा की, तुम्ही दिलेला निर्णय हा योग्य होता
पंच मारुती सातव :कांबळे पैलवान, ऐका!
पै संग्राम कांबळे : वस्ताद तुम्ही आमचं ऐका आता. तुमचं काल आम्ही ऐकलं. बघितलं तुम्हा काय निर्णय दिला तो. तुम्ही निर्णय दिला तो चुकीचा दिला आहे. तुम्ही दबावाला बळी पडून निर्णय दिलाय.
पंच मारुती सातव : कुणाच्या दबावावर? मी कुणाच्या बापाला घाबरत नाही
पै संग्राम कांबळे : जिथे दोन पॉईंट होते तिथे चार पॉईंट तुम्ही दिले.
पंच मारुती सातव : माझं ऐकाना
पै संग्राम कांबळे :सिकंदवर पैलवानावर किती मोठा अन्याय झालाय
पंच मारुती सातव : अहो ज्युरीकडे निर्णय गेला ना!
पै संग्राम कांबळे : तुमचा निर्णय येण्याअगोदर चार गुण मिळाल्याचं घोषित करण्यात आलं. सिकंदर विजय होत असताना तुम्ही महेंद्रला जास्त गुण दिले. हे कधीही खपवून घेणार नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे
व्यवस्थित बोला
पै संग्राम कांबळे : मी व्यवस्थितच बोलतोय

Post a Comment

0 Comments

|