Header Ads Widget


प्राणांतिक अपघात करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

 

नागपूर, दि. १७/०१/२०२३.
कोराडी रोड कोलार नदी पुला जवळ खापरखेडा येथे चालक आरोपी चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन ऍक्टिव्हा गाडी चा चालक मृतक हा त्याचे ताब्यातील गाडीने कोराडी कडुन खापरखेडा कडे येत असतांना ऍक्टिव्हा चे चालकास कार चालकाने समोरा समोर धडक मारून गंभीर जखमी केले. तसेच सदर चालकाने अपघात झाल्याबाबत पोलीसांना सुचना दिली नाही. तसेच घटनास्थळावरून पळुन गेला. जखमीचे डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारकामी मेयो हॉस्पीटल नागपुर येथे नेवुन भर्ती केले असता उपचारा दरम्यान डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपी चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध सुरू असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पिसे पो.स्टे. खापरखेडा हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments

|