Header Ads Widget


महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची चमकदार कामगिरी...!!

33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दिनांक 07/01/2023 ते दिनांक 13/01/2023 रोजी दरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 01 व 02 येथील मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. 

दिनांक 07/01/2023 रोजी पासून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 व 2 येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळ असे एकुण 18 क्रीडा प्रकारांमध्ये 13 संघातील 2590 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेमध्ये पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 

33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील एकुण 18 खेळाडूंची नाशिक परिक्षेत्रीय संघात निवड करण्यात आली होती. त्यापैकी पुरुषांच्या हातोडा फेक या क्रीडा प्रकारात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार हेमंत बारी यांनी 51.10 मी. हातोडा फेकत प्रथम क्रमांक, तर विसरवाडी पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार भुषण चित्ते यांनी 44.73 मी. हातोडा फेकत द्वितीय क्रमांक पटकाविला. 

वुशु या महिलांच्या 49 किलो वजन क्रीडा प्रकारात निंबाबाई वाघमोडे यांनी प्रथम व तायक्वांदो या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार आपल्या नावावर केला. तसेच पुरुषांच्या बॉक्सींग या क्रीडा प्रकारात 51 किलो वजन गटात पोलीस अंमलदार विश्वास वळवी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरुषांच्या हॅण्डबॉल या क्रीडा प्रकारात नाशिक परिक्षेत्र संघाने नागपुर शहराचा 32-21 असा पराभव करत तृतीय क्रमांक पटकाविला. या संघात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार अबिद रोटिवाला, आनंदा मराठे, राहुल गवळी व राजेश गांगुर्डे यांचा सहभाग होता. 

33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी पोलीस अधिकारी गटातून शूटींग या क्रीडा प्रकारामध्ये दुसरे स्थान पटकावून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील, नाशिक परिक्षेत्र संघात निवड झालेल्या पदक प्राप्त सर्व खेळाडूंचा सन्मान करुन पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते. 

Post a Comment

0 Comments

|