Header Ads Widget


अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड व लाखोंचा मुद्देमाल जप्त.

LiveNationNews Bulletin

वाशीम, दि. १९/०१/२०२३.
नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मंगरूळपीर व पोलीस स्टेशन मंगरूळपीर यांच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतून १३,९५,९२०/- रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांना जिल्हा गस्त पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगरूळपीर शहरातील वेगवेगळ्या किराणा दुकानामध्ये तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. सदर धाडीमध्ये एकूण ०६ आरोपींकडून बोलेरो पीकअप वाहन अं.किं.७,००,०००/-रु., दोन मोबाईल फोन अं.किं.२०,०००/-रु., सुगंधित तंबाखू व गुटखा अं.किं.५,७०,४२०/-रु. व नगदी १,०५,५००/-रु. असा एकूण १३,९५,९२०/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींवर पो.स्टे.मंगरूळपीर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांचे सोबत सपोनि.निलेश शेंबडे, पोहेकॉ.फिरोज, पोना.वानखडे, चव्हाण, पोकॉ.मंगेश गादेकर, मपोकॉ.सुप्रिया डोंगरे यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

|