Header Ads Widget


पांझरा-कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी नव्याने निविदा काढा; आमदार मंजुळाबाई गावितांची मागणी


साक्री ! Sakri/LivenationNews 

साक्री तालुक्यात ड्रोन द्वारे शेती पिकांवर प्रायोगिक तत्वावर औषध फवारणी करावी,शासकीय नोकरीत लागलेल्या बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व तसेच पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याची नव्याने निविदा काढून सुरू करावे यासह शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून साक्री विधानसभेच्या आ. मंजुळाताई गावित यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले.
   नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आ. मंजुळाताई गावीत यांनी धुळे व नाशिक जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मधून भरघोस आर्थिक मदत केल्याने आभार मानले तसेच साक्री तालुक्यातील सन २०१८-१९ मध्ये खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ९७ कोटी २० लाख रुपयांची प्रलंबित थकबाकी देण्याची मागणी केली साक्री तालुक्यात दरवर्षी जास्त पाऊस पडतो यामुळे पिकांवर रोगराई येते औषध फवारणी करावी लागते यासाठी मजूर मिळत नाही यामुळे आधुनिक पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन च्या माध्यमातून पिकांवर फवारणी करण्यात यावी, शासनाच्या विविध विभागात काही कर्मचाऱ्यांनी आदिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळवून घेतले आहेत बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याकडे लक्ष वेधले गेल्या वीस वर्षापासून साक्री तालुक्यातील पांझरा- कान सहकारी साखर कारखाना बंद आहे बँकेने सरपेशी कायद्यान्वये स्पर्श शुगर इंडस्ट्री या कंपनीत भाडेपट्ट्याने कारखाना चालवण्यात दिलेला आहे परंतु कंपनीला कारखाना सुरू करायचा नसून कारखान्याची मालमत्ता भंगारामध्ये विक्री करण्याचा प्रयत्न आहे तो पांझरा कान सहकारी कारखाना बचाव कृती समितीने हाणून पाडला आहे. साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होते शेतकऱ्यांना बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस विक्री करावा लागतो तेव्हा तालुक्यातील पांझरा-कान सहकारी कारखान्याची नव्याने निविदा काढून हा कारखाना सुरू करावा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी साक्री च्या आ. मंजुळाताई गावीत यांनी अधिवेशनात केली. साक्री तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न, पिंपळनेर येथे १३२/३३ वीज उपकेंद्र उभारणीचा प्रश्न, बसरावळ, खैरकुंटा,वेहेरगांव आणि काब-याखडक या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या लघु प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले,साक्री तालुक्यातील विकास कामांना लवकर मंजुरी मिळेल असे आ.गावीत यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments

|