Header Ads Widget


गोळीबार सरावाच्या कारणास्तव ईदगाह मैदान परिसरात मनाईजिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत नागरिकांच्या प्रवेशास मनाई





नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews



   नंदुरबार,  बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर 2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने या परिसरात नागरिकांना प्रवेशास मनाई असेल, असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात या कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी  कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

|