Header Ads Widget


फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या.

LiveNationNews Bulletin

पुणे शहर, दि. २३/०१/२०२३.
चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन रणदिवे, यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,मातोश्री सोसायटीचे समोरील, मोकळया मैदानामध्ये नागपाल रोड,चंदननगर पुणे येथे एक इसम संशयीतरीत्या ऊभा असून, त्याचेकडे कोयत्या सारखे एक हत्यार आहे. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी केली असता.
सदर बातमीतील वर्णनाचा एक इसम तेथे ऊभा असल्याचे दिसल्याचे स्टाफला पाहताच तो तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना, सर्व स्टाफने त्यास शिताफीने जागीच पकडले. अंगझडतीमध्ये त्याचे कंबरेला मागील बाजुस पॅन्टचे आतमध्ये खोचलेले एक लोखंडी कोयता मिळुन आल्याने त्याचे विरूद्ध अंमलदार नामदेव गडदरे यांनी चंदननगर येथे गुन्हा नोंद केला असुन सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान हुसेन शेख याने कोरेगाव पार्क येथे गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त परीमंडळ-4 पुणे शहर,श्री.शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग,पुणे, श्री.किशोर जाधव यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक,राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक,(गुन्हे),जगन्नाथ जानकर चंदननगर पो. स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी.अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार, सुहास निगडे,सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडगर, श्रीकांत शेंडे, शिवा धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केली आहे.
 

Post a Comment

0 Comments

|