LiveNationNews Bulletin
दिनांक 21.01.2023 रोजी दुपारी 02.00 वाजेच्या सुमारास श्री. सचिन भगवान पाटील,वय 44 वर्षे, धंदा चालक ,रा. प्लॉट नं. 18(ब), शुभम पार्क, सहारा टाऊन, नंदुरबार हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुली-ओली फाटा जवळील खांडबाराकडे जाणाऱ्या रोडावर त्यांच्या मालकीचे वाहन क्रमांक -MH 39 AD 1133 हिचेने नंदुरबार शहरातील त्यांच्या नातेवाईकाचा किराणा दुकानाचा माल रुमकी तलाव ता. निझर जि. तापी येथून नंदुरबार येथे घेवून येत असतांना तीन मोटार सायकलवरील अज्ञात इसमांनी श्री. सचिन पाटील यांचे वाहन अडवून त्यांना खाली उतरवून अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या दुचाकी मोटार सायकलवर बसवून वेडापावला गावाजवळ घेवून गेले व त्यांचे खिशातील मोबाईल जबरीने काढून घेतला. तसेच सदर घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर जिवेठार मारण्याची धमकी देवून पुन्हा गुली-ओली फाटा येथे आणून सोडले व त्यांच्या मालकीची सुमारे 7,00,000/- लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन क्रमांक MH 39 AD 1133 व त्यात असलेला 20,000/-रुपये किमतीचे साखरेचे पोते, तेलाचे डबे इत्यादी किराणा साहित्य जबरीने लुटुन नेला, म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 19/2023 भा.द.वि. कलम 395,341,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे हे घटनास्थळी दाखल झाले. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर होता, म्हणून नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदी करणेबाबत सांगितले.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दिनांक 21/01/2023 रोजी गुली-ओली फाटा जवळील खांडबाराकडे जाणाऱ्या रोडावर झालेला दरोडा नळवे व खैरवा येथील 1) शातारामा वळवी 2) नितीन वळवी 3) अंकुश वळवी (4) हसन पाडवी यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने मिळून केलेला आहे. सदरची माहीती नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांना कळवून मिळालेल्या बातमीमधील संशयीतांना ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे व त्यांच्या पथकाने नळवा, उमर्दे व खैरवी गावात जावून संशयीताचा शोध घेतला असता 1) शातारामा वळवी 2) नितीन वळवी 3) अंकुश वळवी (4) हसन पाडवी हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता 1) शाताराम कांतीलाल वळवी वय 23 वर्ष 2) नितीन संजय वळवी वय 24 वर्ष दोन्ही रा. नळवा ता. जि. नंदुरबार 3) अंकुश देवानंद वळवी वय 21 वर्ष 4) हसन विकास पाडवी वय 23 वर्ष दोन्ही रा.खैरवा ता. नवापूर जि. नंदुरबार असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याबाबत सविस्तर हकिगत सांगून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून घेतलेला टाटा एस छोटा हत्ती चारचाकी वाहन तळोदाकडे जाणाऱ्या रोडावर सोडून दिला बाबत सांगितल्याने पथकाने तात्काळ तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यातील चारचाकी वाहनाचा शोध घेतला असता सदरचे वाहन तळोदा पोलीस ठाणे हद्दीत बेवारस मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
0 Comments