Header Ads Widget


ज्येष्ठ नागरीकांची फसवणुक करणारे, सायबर गुन्हयात अटक.

 

LiveNationNews Bulletin

मुंबई शहर, दि. २४/०१/२०२३.
घाटकोपर, मुंबई येथील ड्रायफुटचे होलसेल व्यापारी यांना वेगवेगळ्या अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अनोळखी आरोपीतांनी फोनवर संपर्क साधून तसेच मेल आय.डी. वर मेल संपर्क करून आपसात संगणमत करून, कट कारस्थान करून ते इन्शुरन्स कंपनी मधुन बोलत असल्याचे सांगुन फिर्यादी यांची एक पॉलीसी असल्याचे सांगुन ती सरेंडर केल्यास सदर पॉलीसीची रक्कम ७,७०,९३,०२८/- रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवुन ती रक्कम फिर्यादी यांना मिळवून देतो असे सांगुन, तसेच ते भासवुन व विश्वास संपादन करून वेळोवेळी विविध कारणांसाठी अनेक बँकेत पैसे भरण्यास भाग पाडले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रिसिप्ट, रिझर्व्ह बँकेचे पत्र, नॅशनल पेमेन्ट कार्पोरेशन ऑफ इंडीयाचे पत्र तसेच मिनीस्टर ऑफ फायनान्सचे सही शिक्क्यानिशीचे बनावट कागदपत्रे ईमेलव्दारे पाठवून त्यांची एकुण रुपये ४,३९,५७,५३२/- इतक्या रक्कमेची आर्थिक फसवणुक केली होती त्यावरून पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या तपासात एकुण 27 विविध राज्यातील विविध बॅंकखाते निश्पन्न झाले होते. त्यामध्ये हैद्राबाद येथील बॅकेतील खात्यामध्ये नमुद गुन्हयातील एकुण 71 लाख रूपये इंन्ष्युरन्स पाॅलिसीच्या मॅच्युरीटीच्या नावाखाली घेण्यात आले होते. त्यामध्ये अटक आरोपी हा लाभधारक बॅकखातेधारक असल्याचे निश्पण्ण झाल्याने त्यास अटक करण्यात आली. अटक आरोपीच्या तपासात याचे नोएडा, उत्तर प्रदेष येथे मोबाईल शोपीचे नाम मात्र दुकान असुन त्यातून इंन्ष्युरन्स पाॅलिसीच्या नावाखाली फसवणुक करणाऱ्या टोळीशी संगनमत करून फसवणुक केलेली रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये घेवून तो नोएडा परिसरातील विविध बॅकांचे एटीएमद्वारे विथड्राॅव्हल करून तसेच विविध बॅंकांमध्ये मनी ट्रान्सफरद्वारे वळती करून सदरच्या रक्कमांची संगनमताने विल्हेवाट लावत असल्याचे तपासात निश्पन्न झाले.
अटक आरोपीत अटक करण्यात आली. सदर आरोपीताने सदर गुन्हयातील बॅकखाते आरोपीतांना देवून प्रत्येक बॅक खात्यामागे 15 हजार रूपये मिळवित असे. अशा प्रकारे त्याने मागील १ वर्षाच्या कालावधीत 25 बनावट बॅंकखाते उघडून दिल्याचे निश्पन्न झाले आहे. सदरचे बॅंकखाती ही उघडतेवेळी गुन्हयातील निश्पन्न बॅंकखातेधारक यांना कर्ज मिळवून देण्याचे अमिश दाखवून त्यांचे बनावट घरभाडे करारपत्र तयार करून त्याआधारे आधारकार्ड वर पत्ता बदलून मोबाईल कंपनीकडून मोबाईल सिमकार्ड घेवून ऑनलाईन पध्दतीने विविध बॅंकांमध्ये त्यांचे नावे बॅंकखाते उघडत असे. तसेच एटीएम डेबीटकार्ड हे कुरीअर कंपनीमार्फत स्वतःकडे घेवून सदरचे एटीएम डेबीट कार्ड व बॅंक धारकांचे मोबाईल सिमकार्ड हे आरोपीत रवि सिंह सरोज सिंह व सुमीत चैधरी यास देवून ते फसवणूक केलेल्या अनेक रक्कमांची विल्हेवाट लावत असेतसेच सदर आरोपीत हा रविकुमार सरोजसिंह याचेकडून लोकांचा डेटा घेवून त्यांना इन्ष्युरन्स पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याचे अमिश दाखवून व नोकरी देण्याचे अमिश दाखवून लोकांना फोन करून त्याने पाठविलेल्या रक्कमा वरील नमूद बनावट बॅंकखात्यामध्ये घेवून फसवणुक केल्याचे निश्पन्न झाले आहे.

आरोपीत अटक करण्यात आली. सदर आरोपीत हा सलारपुर, भंगेल, नोएडा, उत्तरप्रदेष येथे काॅल सेन्टर चालवित असून त्याचे काॅलसेन्टर मधून त्याचेसोबत काम करणारे इसमांकडून व स्वतः अनेक राज्यातील लोकांना काॅल करून त्यांना इन्ष्युरन्स रक्कम मिळवून देण्याचे अमिश दाखवून तसेच नोकरी देण्याचे अमिश दाखवून तसेच जाहीरात देवून लोकांकडून लाखो रूपयांच्या रक्कमा घेवून फसवणूक करत असल्याचे निशन्न झालेले आहे
सदर गुन्हयातील तपासादरम्यान आरोपीतांने वापरलेले मोबाईल क्रमांक व आय.एम.ई.आय क्रमांक हे मुूंबई षहरातील 3 गुन्हयाषी तसेच विविध राज्यातील एकुण 11 गुन्हयात असे एकुण 14 गुन्हयांषी मिळतीजुळती आलेली आहे. सदर गुन्हयात आरोपीतां कडुन विविध बॅंकाचे 18 एटीएम डेबीटकार्ड, बॅंक पासबुक, विविध राज्यातील लोकांची फसवणुक करण्याकरीता तयार करण्यात आलेले नाव, फोन नंबर व ईमेल आय.डी., आधारकार्ड, आयकर विवरण व सॅमसंग कंपनीचे 07, विवो कंपनीचा 01, रिडम मी कंपनी 001, ओपो कंपनीचा 01 व रिअल मी कंपनीचा 01 असे एकुण 12 मोबाईल व लिनोआ कंपनीचे 03 थिंक पॅड, डेल कंपनीचा एक लॅपटाॅप, एच पी कंपनीचा एक लॅपटाॅप व रूपये 44,400/- रोख जप्त करण्यात आले आहेत.

सदर गुन्हयात अदयाप पर्यंत आरोपीतांच्या बॅंक खात्यामधील फसवणुक केलेली रक्कम 20 लाख 50 हजार रूपये फ्रीज करण्यात आली आहे. आरोपीत याने मागील एक वर्शाच्या कालावधीत अनेक लोकांची फसवणुक करून फसवणुक केलेल्या करोडो रूपयांच्या रक्कमा काालेले आहे. सदर अटक आरोपीताचा सहभाग अष्या प्रकारे जेश्ठ नागरीकांचा विष्वास संपादन करून त्यांना वेगवेगळया प्रकारचे आमिश दाखवून फसवणुकीच्या अनेक गुन्हयामध्ये निश्पन्न होत आहे. त्याबाबत तपास चालु आहे
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री.विवेक फणसळकर, मा. विषेश पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डा.ॅज्ञानेष्वर चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त डाॅ. बाळसिंग राजपूत (सायबर गुन्हे),मा.सहायक पोलीस आयुक्त, राजेष नागवडे, प्रभारी पोलीस निरीक्षक एस. एस. सहस्त्रबुध्दे यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ मोरे यांचे पर्यवेक्षणा खाली पो.नि. प्रकाष वारके, स.पो.नि. श्रीनिवास कामुणी, पोलीस हवालदार 31497/राजेष पाटील, पोलीस हवालदार 980476/आकाष षिंदे, पोलीस षिपाई 093297/किसन राठोड, पोलीस षिपाई 090457/युवराज पाटील, पोलीस षिपाई 092592/प्रताप जाधव यांनी पार पाडली.
याद्वारे मुंबई पोलीस सर्वसामान्य जनतेस आवाहन करीत आहेत की,

  1. जेश्ठनागरीक, जनसामान्य लोकांना विनंती आहे की, अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या भामटयां पासुन सावध रहावे
  2. मोबाईल, फोनवरील अनोळखी व्यक्तीला आपला बॅक अकाउंट नंबर, पासवर्ड, ओ.टी.पी.,केवायसी, डेबीट कार्ड क्रमांक, आधारक क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक अषी संवेदनशील माहिती मागत असतील तर फोन त्वरीत कट करून नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा
  3. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्या वरून कोणतेही मोबाईल अँप डाउन लोड करू नये तसेच लिंक क्लिक करू नये
  4. कृपया बॅंक खाती उघडण्यासाठी तुमची कागदपत्रे इतर व्यक्तींस देवु नयेत, कोणासही तुमचे सिमकार्ड वापरण्याची परवानगी देवु नये. दुसरा वापरत असलेल्या आपल्या गोश्टी बेकायदेषीर कारणांसाठी वापरल्या जावु शकतात.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 8:52:3 PM