Header Ads Widget


ग्रामपंचायत देगाव ता.साक्री चे नवनिर्वाचित उपसरपंच श्री. सुधीर अरुण अकलाडे यांची निवड...

साक्री ! Sakri/LiveNationNews

प्रतिनिधी अकील शहा

ग्रामपंचायत देगाव ता.साक्री चे नवनिर्वाचित उपसरपंच श्री. सुधीर अरुण अकलाडे यांनी  पदभार स्वीकारल्यानंतर स्वखर्चातून गावातील आर्थिक परिस्थितीने दुर्बल असलेल्या सौ.पुष्पाबाई सोनवणे ह्या अर्धांगवायू आजाराने पीडित असल्यामुळे त्यांना व्हील चेअर भेट देण्यात आली. त्यांच्या ह्या उपक्रमामुळे तालुक्यातून सर्व स्तरातून त्यांच्या औदाऱ्याचे कौतुक होत आहे. सरपंच सुरेखा गायकवाड, उपसरपंच सुधिर अरूण अकलाडे, ग्रामपंचायत सदस्य निर्मलाबाई अकलाडे, मनोज अकलाडे, काशीनाथ अहिरे ,मोहन अहिरे, राजेश मालिच ,द्रौपदी देसले, मीलुबाई बहिरम,अनिता अहिरे, सिमा मालिच यांच्या हस्ते व्हील चेअर देण्यात आली.
याप्रसंगी सुभाष अकलाडे ,प्रशांत अकलाडे ,अरुण देसले, किरण देसले ,दगडू देसले, कांतीलाल सुर्वे ,जयवंत सुर्वे, गणेश अहिरे, रामदास दहीते, दादाजी दहिते ,विजय दहिते, प्रविण शिंदे, नितिन अकलाडे, विजय अकलाडे ,बारकु देसले, प्रमोद बहिरम ,संजय अकलाडे , देवानंद सोनवणे, संजय देसले जितेंद्र देसले, जितेंद्र अकलाडे, कैलास सोनवणे, भिकन दहिते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|