Header Ads Widget


नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न....


 
नंदुरबार/ LiveNationNews Bulletin 


नंदुरबार, महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ साठी सोमवार 30 जानेवारी,2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नेमलेले सर्व अधिकारी-कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्र.उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, मिलिंद कुलकर्णी, गिरीश वखारे, रामजी राठोड आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.मोरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देवून मतपेट्या, डमी मतपत्रिका, निवडणूक संबंधित विविध फॉर्म्स व  विविध नमूने हे हाताळण्यासाठी उपलब्ध करून दिले.

 

यावेळी मतपेट्या हाताळण्याबाबतची एक चित्रफीतही प्रशिक्षणार्थ्यांना दाखविण्यात आली. या प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार वामन चौरे, आशा सोनवणे तसेच संदीप रामोळे, गवळी, किशोर भांदुर्गे, गोकुळ पाटील, ओम कुलकर्णी यांनी केले. प्रशिक्षणास मोठ्या संख्येने निवडणुकीसाठी नेमलेले अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|