Header Ads Widget


1 दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले.

नवजात अर्भकाबाबत आवाहन

नंदुरबार, दि.3 डिसेंबर,2023 (जिमाका वृत्तसेवा): अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी नदीच्या पात्रात 13 डिसेंबर,2022 रोजी 1 दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले आहे. या अर्भकावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यु.पी.पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

सदर स्त्री जातीचे अर्भक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह बाल कल्याण समिती अध्यक्ष (9307143016), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार (02564-210047)  तसेच चाईल्ड हेल्पलाईन  (1098) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (9421477143 ) वर संपर्क साधुन सदर बाळांस दहा दिवसाच्या आत ताब्यात घ्यावे. अन्यथा सदर बाळांस शिशुगृहात दाखल करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री.पाडवी यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Wednesday, August 20. | 12:00:37 PM