प्रतिनिधी : फहीम शेख
आज दि. 16/01/2025रोजी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची नंदुरबार आगाराची वार्षिक सर्व साधारण निवडणुक अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात पार पडली, बैठकीत अध्यक्ष पदी शरीफ मंसूरी, सचिव पदी प्रकाश ईशी कार्याध्यक्ष पदी हिरामण पाटील तसेच कोषाध्यक्ष पदी संतोष पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वरील सर्व नवनिर्वाचित मान्यवरांचे संघटने कडून तसेच सर्व सदस्यांकडून अभिनंदन, व शुभेच्छा देणे सुरु आहे.
सदर निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात, निवडणूक निरीक्षक म्हणून आलेले श्री नंन्नोरे साहेब (धुळे), संजय मोरे, G.S.ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले या साठी त्यांचे संघटने कडून व सर्व नवनिर्वाचित मान्यवरांकडून आभार व्यक्त करण्यात आले .
0 Comments