अक्कलकुवा प्रतिनिधी प्रकाश नाईक
अक्कलकुवा :- शासकीय रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय नंदुरबार येथे मनुष्यबळ पुरवण्यासाठी खाजगी कंपनीला टेंडर देण्यात आले आहे परंतु सदरील कंपनी मनुष्यबळ पुरवण्यासाठी असमर्थ आहे किंवा जाणून बुजून टाळाटाळ करत आहे असे निदर्शनात येत आहे.
शासकीय रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय नंदुरबार येथील अधिष्ठाता यांना याची विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या माहिती नुसार रुग्णालय प्रशसनाने स्मार्ट या कंपनीकडे मनुष्यबळ पुरवण्यासाठी वारंवार मागणी करून व पत्र देऊन देखील रुग्णालयात मनुष्यबळ पुरवत नाही.
आम्हाला मिळालेली माहिती नुसार सदरील कंपनी ही पहिली एनर्जी कंपनी या नावाने होती परंतु या कंपनीचा भोगळ कारभार मुळे तिला ब्लॅक लिस्ट करण्यात आले.
परंतु त्याच (एनर्जी) मालकाने एक दुसरी कंपनी स्मार्ट एजन्सी नावाने परत नवीन टेंडर मिळवले.
सदरील कंपनीचे काही एजंट गरजू लोकांनकडून पैसे (लाच) घेऊन कोणतीही वैद्यकीय शिक्षण पात्रता नसलेले लोक कामावर रुजू करत आहे.
जो पैसे (लाच)देईल त्याला काम मिळेल अशी यांची भूमिका दिसत असल्या कारणाने ते पूर्ण पद भरती करत नाही.
परंतु रुग्णालयात कमी मनुष्यबळ व अपुरा सुविधांचा जिल्ह्यातील आदिवासी भागातील गरीब लोकांचा जीवाशी खेळ होतोय .
तरी सदरील विषय हा अतिशय गंभीर असून रुग्णालय प्रशासनन व सदरील कंपनी आणि कंपनीचे एजंट कुठल्याही परिस्थितीत गरीब जनतेसाठी नव्हे तर स्वतःच पोट भरायचं काम करत आहे. तरी सदरील कंपनी यांनी लवकरात लवकर याचा खुलासा करावा. अन्यथा राष्ट्र विकास सेना यांच्याकडून येणाऱ्या काळात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता व स्मार्ट कंपनी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे राष्ट्र विकास सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या संदर्भात विविध कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले आहे.
1) मा. मुख्यमंत्री सो. मुख्यमंत्री कार्यालय मुंबई
2) मा. वैद्यकीय शिक्षण मंत्री सो. कार्यालय मुंबई
3) मा. आरोग्यमंत्री सो. आरोग्यमंत्री कार्यालय मुंबई
4) मा. आयुक्त सो. राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई
5) मा. संचालक सो. आरोग्य सेवा,मुंबई
6) मा. उपसंचालक सो. आरोग्य सेवा मंडळ नाशिक
7) शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार
इत्यादी कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आल आहे
0 Comments