Header Ads Widget


प्रा.प्रकाश सोनवणे यांच्या हस्ते जेष्ठ वारकरी ह.भ.प. अशोक साळूंके यांचा ७६ वर्षी पदार्पणानिमित्त सत्कार.

 


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथील एक आगळ वेगळं पान म्हणजे जेष्ठ वारकरी,जेष्ठ रंगकर्मी, जेष्ठ लोकसेवक,जेष्ठ गायनाचार्य जेष्ठ भारुडाचार्य गुरुवर्य ह.भ.प.तात्यासाहेब अशोक भगवान साळुंके यांनी वयाची ७५वर्ष पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण केले आहे पण अजूनही माऊली दंड ठोकत लोकसेवेसाठी हजर आहेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर शेवाळी गावात वारकरी सांप्रदायाची अखंड ज्योत तेवत आहे ती गुरुवर्य तात्यांमुळेच.गावातील तरुण मंडळी याला साक्ष आहेत गावात अनेक भजनी मंडळी होती पण त्यात तरुणांना प्रेरणा देऊन पुढं करण्याचं काम फक्त तात्यांनी केले त्यासाठी ते प्रसंगी कटू अनुभवांना सामोरे गेले पण त्याच फळ आज सर्व तरूण मंडळी संप्रदायात पारंगत झाली. धुळे जिल्ह्यातच नव्हे तर बागलाण व खान्देशात शेवाळी गावाचं नाव शिखरापर्यंत पोहोचविले तात्यांना जेष्ठ वारकरी,शाहीर साबळे,भारुडाचार्य असे अनेक पुरस्कार मिळाले असून हे शेवाळी गावातील निगर्वी व्यक्तिमत्त्व तात्या म्हणजे तंटामुक्तीच केंद्र ,एक उत्कृष्ठ शेतकरी,वधु वर सुचक केंद्र अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र ठरत आहे. असे ज्येष्ठ वारकरी अशोक तात्या साळूंके यांचा वाढदिवसा निमित्त प्रा.प्रकाश सोनवणे, गावकरी,विविध शैक्षणिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिकांकडून सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

|