Header Ads Widget


18 वर्षीय भारतीय तरुणाने केला आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम, बनला सर्वात तरुण NGO संस्थापक

शहादा प्रतीनिधी : जुनैद अहमद - महाराष्ट्रातील 18 वर्षीय अब्दुल खालिक जसिम शेख या तरुणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक विक्रम केला आणि सर्वात तरुण NGO संस्थापकाचा किताब पटकावला. वयाच्या अवघ्या १८ वर्षे, १० महिन्यांत,अब्दुल खालिक शेख यांनी अब्दुलखालिक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली, ज्याचा उद्देश भारतातील वंचित समुदायांना शिक्षण आणि कल्याणकारी सेवा प्रदान करणे आहे.सामान्य कुटुंबातून येणारा व नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा शहरात राहणारा हा तरुण याने हा मोठा पराक्रम गाजवला. त्याचे वडील जसीम शेख हे कपड्यांचे छोटे दुकान चालवतात. अशा पार्श्वभूमीतून येऊनही अब्दुल खालीक शेख यांनी आपल्या जिद्द आणि समाजसेवेच्या भावनेने विश्वविक्रम केला. यातून त्यांची सामाजिक कार्याप्रती असलेली बांधिलकी दिसून येते आणि त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

त्यांचे फाउंडेशन शिक्षण, आरोग्य आणि बालविकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. अब्दुल खालिक शेख यांचा हा उपक्रम त्यांना तरुणांसाठी प्रेरणा देणारा आहे.

Post a Comment

0 Comments

|